आहे मी?

हरवत जातो आहे मी, भटकत जातो आहे मी
मला न सापडे माझा मी..असा कसा आहे मी..

गोंधळ उडतो फार मनाचा, हे करावे कि ते करावे..
सल्ले अनेक.. वास्तवाचे फेक.. झेलत जातो आहे मी..

भ्रमात राहू नकोस राजा, असा इशारा करते नियती..
मृत्यूचेही आता भय नाही… अशा निद्रेत आता आहे मी…

कुठेहि जावे लक्ष्मी च्या मागे, धावत आहे हि दुनिया..
समाधान ते हवे असे मज..शोधात बसलो आहे मी..

सुखाची मज न आस वेड्या.. दुखाचे धागे जपतो रे.
अश्रुना त्या पिऊन अलगद नेत्र कोरडे पुसतो आहे मी..

गेली लाकडे अर्धी अधिक.. आता मागणे नाही काही सुदिक..
आत्म्याला धीर देत देत थांबायला सांगत आहे मी

बेपत्ता पुत्राच्या शोधात आधुनिक हिरकणी आणि प्रामाणिक हेड कोन्सटेबल

बेपत्ता पुत्राच्या शोधात आधुनिक हिरकणी आणि प्रामाणिक हेड कोन्सटेबल

बेपत्ता मुलाचा शोध लागत नसल्याने व त्याचेशी मोबाईल वरून संपर्क होत नसल्याने, मुंबई – गोवा महामार्गावर भर मध्यरात्री एकटीच स्कुटरवरून निघालेली धाडसी माता आणि तिला अनमोल सहकार्य करणारा महाड चा प्रामाणिक हेड कोन्सटेबल यांची हाती आलेली कहाणी आधुनिक हिरकणीची आठवण करून देणारी आहे.. या मातेस अनुभवास आलेली तिच्या राहत्या गावातील पोलीस खात्याची निष्क्रियता संताप आणीत असतानाच महाडच्या एक सर्वस्वी अनोळखी पोलीस हेड कोन्सटेबलने दाखवलेले अनन्य साधारण प्रमानिक्पण मात्र आपणास थक्क करून टाकते. हि घटना चित्रपटाला शोभेल अशीच, पण ती सर्वार्थाने सत्य अशी आहे.आणि गेल्या ११ डिसेंबर ला गोवा महामार्गाच्या प्रवासात घडलेली..

मातृत्व, धाडस आणि प्रामाणिकपणा यांना आजच्या जगात एक आगळा आयाम मिळवून देणा-या या वास्तव घटनेतील हि ‘आधुनिक हिरकणी माता’ म्हणजे डोंबिवली मधील interior Decoratorश्रीमती बिना ठक्कर तर महाडचा प्रामाणिक पोलीस म्हणजे वाहतूक पोलीस चौकीतील हेड कोन्सटेबल प्रमोद कृष्णा माने.
११ डिसेंबर ला विक्रम आपल्या आल्तो मारुती कार ने गोव्याला जाण्याकरिता दोम्बिविलीतून घरून सकाळी दहा वाजता निघाला. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास श्रीमती बिना ठक्कर यांनी त्याची चौकशी करण्यसाठी मोबाईलवर फोन केला. मोबाईल बंद होता. नेटवर्क नसेल असा विचार करून श्रीमती ठक्कर यांनी तासाभराने पुन्हा फोने लावला. फोन लागला नाही. विक्रमाचे वडील त्यावेळी पुण्यात होते. घरात श्रीमती ठक्कर आणि त्यांची कन्या असे दोघेच होते.. सलग तीन-चार तास असाच प्रकार घडल्यानंतर मातेच्या मनात चिंतेची पाल चुकचुकली. गोवा राष्ट्रीय महामार्गावर घडणा-या वाहन अपघातांच्या बातम्या डोळ्यासमोर येताच अस्वस्थतेत आणखी भर पडली. अखेर त्यांनी डोम्बीविली पोलीस स्टेशन घातले. सारा प्रकार सांगून माझ्या मुलाचा ठाव ठिकाण शोधून काढण्यास सहकार्य करा अशी विनंती केली. त्यावर ‘चोवीस तास थांबा’ असे टिपिकल उत्तर डोम्बीविली पोलिसांकडून मिळाले.
संध्याकाळ सारून रात्र होवू लागताच पुत्राविशायीच्या अस्वस्थतेत आणखी वाढ होवू लागली. त्या मातृत्वाने अखेर एक धाडसी शोध मोहिमेचा विचार मनात पक्का केला आणि कन्येला घरात एकटेच ठेवून रात्री बारा वाजता विक्राळा शोधण्यासाठी घर सोडले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मुलाची गाडी कुठे दिसते का याचा शोध घेत होंडा स्कूटर वरून त्यांचा प्रवास सुरु झाला. रात्री दोन वाजता त्या पनवेल ला पोहोचल्या. रस्त्यावरच्या वाहतूक पोलिसांना शंका आली. आश्चर्य वाटले. त्यांनी त्यांना थांबवले. मुलाच्या शोधतील मातृत्वाची कथा ऐकून घेतली आणि सांगितले. ‘तुम्ही इथेच थांबा, पुढे एकट्या महिलेने जाणे योग्य नाही’. परंतु ठक्कर यांचे मन समाधान करून घ्यायला तयार नव्हते. त्या कर्नाळा खिंड, हमरापूर, पेण, रामवाडी असा शोध घेत वडखळ नाक्यावर पाहते पाच वाजता पोहोचल्या. तिथेही विचारणा झाली, एकटीनेच स्कुटरवरून पुढे जावू नये असेही सांगण्यात आले. पण तुमच्या मुलाला आम्ही शोधून काढतो, असा विश्वास मात्र कुणीही दिला नाही.
वडखळ हून त्या पोचल्या सकाळी दहाच्या सुमारक महाड शहर जवळच्या वाहतूक पोलीस चौकीत, पोलीस हेड कोन्सटेबल प्रमोद कृष्णा माने तिथे एकटेच होते. त्यांनीही आस्थेने ठक्कर यांची कहाणी ऐकून घेतली. पुढच्या मार्गावर सर्व पोलीस ठाण्यांना कळवू, तुम्ही पुढे जावू नका असे सांगितले. पण पनवेल, वडखळ मधील पोलिसांप्रमाणेच हे असावे असा समाज करून घेत ठक्कर पुढच्या शोध मार्गावर निघाल्या.

महाड जवळच्या कामात हॉटेल मध्ये चहा घेण्यासाठी थांबल्या असताना आपली पर्स आपल्याकडे नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. पर्स महाड वाहतूक पोलीस चौकीत राहिली असावी अशी शंका आल्याने त्या परत मागे आल्या. वाहतूक पोलीस चौकीत हेड कोन्सटेबल माने एकटेच होते. ठक्कर परत आल्याचे पाहताच त्यांनी तत्काळ त्यांची पर्स काढून दिली. ठक्कर यांचा जीव भांड्यात पडला. कारण त्या पर्स व्यतिरिक्त कोणतेही पैसे त्यांच्याकडे नव्हते आणि पर्स मध्ये होते सुमारे सात लाखांचे मौल्यवान सोन्याचे दागिने.
माने यांच्या प्रमानिक्पानामुळे सारेच सारखे नसतात, असा पोलीसंविशायीचा त्यांचा ग्रह तर दूर झालाच पण मुलाला अपघात झाला असेल तर त्याला तत्काळ मदत मिळावी या उद्देशाने सोबत घेतलेले दागिने सारेच्या सारे परत मिळाल्याने त्या थक्क झाल्या. पोलीसंप्रतीचा एकास तर दूर झालाच उलट सन्मानाने सलाम ठोकण्यास पोलीस पात्र आहेत अशीच त्यांची भावनाबनली.
महाधून निघून पुढे कशेडी घात, खेद, चिपळूण, कणकवली करत ठक्कर यांनी १२ डिसेंबर रोजी चार वाजता सावंतवाडी घातले आणि नेमका तिथेच तो अतुअछ्य आनंदाचा क्षण जुळून आला. गोव्यातून विक्रमाचा मोबाईल वर फोन आला. विक्रमाचा आवाज ऐकला मात्र त्यांचा सारा क्षीण एका क्षणात निघून गेला. मन आणि डोके चिंतामुक्त झाले. विक्रम च्या मोबाईल ची battery संपली होती. चार्जर सोबत नव्हता. परिणामी त्याचा फोन बंद होता. तो सुखरूप असल्याचे त्याला माहित होते, पण आईला कळले नव्हते. शेवटी ते कळले. मुलगा भेटल्याचा आनंद तर होताच, पण त्याहीपेक्षा महत्वाचा होता तो महाडचे पोलीस हेड कोन्सटेबल प्रमोद कृष्णा माने यांच्या प्रामाणिकपणाने झालेला आनंद.
बक्षिसापोटी देवू केलेली रक्कमही माने यांनी विनम्रपणे नाकारल्याने मला मोठे बाल मिळाले. तुम्ही त्यांची बातमी फोटोसह द्या, माझा फोटो नको. सर्वांपर्यंत त्यांच्या प्रामाणिक पण पोचावा, हा या ‘आधुनिक हिरकणी मते’ ने विनंतीपूर्वक दिलेला निरोप प्रसिद्धीसाठी झपाटणा-या सर्वाना मोठा आदर्श वस्तुपाठ घालून देणारा ठरावा.

बातमीदार – जयंत धुळप (अलिबाग)
सौजन्य : लोकसत्ता, दिनांक २२ डिसेंबर २००९

या लेखाचे वाचन झाल्यावर काही प्रश्न मनात डोकावातीलाही पण त्यातील प्रामाणिकपणाचे उदाहरण सर्वांपर्यंत पोहोचावे हाच उद्देश..

आपण सर्व यावर चर्चा करू शकतो…

निवेदन

SHADI.COM VAR HE LIHAYALA GELO PAN TITHE MARATHI FONT DISPLAY HOT NAHIYE… RAJ THAKARE NA SANGAYALA PAHIJE…
पालकांना नम्र निवेदन..
मी कर्तव्य आहे म्हणून लग्नासाठी उभा आहे म्हणून काहीठिकाणी माहिती दिली आहे..
इथे तर पैसे भरून profile हि तयार केली आहे..मी जिथे राहतो ते मुंबई किवा पुणे शहर नाही..त्याचे नाव महाड आहे.. रायगड जिल्ह्यामधील
तर सांगायचा मुद्दा असा कि मी फक्त महाड ला राहतो म्हणून किती ठिकाणाहून नकार आले आहेत…
नकाराचा कारण काय तर महाड खेडेगाव आहे म्हणून…
मला इथे स्पष्ट सांगावेसे वाटते कि महाड हे खेडेगाव नाही…
हा आता आमचा जन्मच इथला त्याला आम्ही तरी काय करणार..
आम्हीही मुंबई मध्ये, पुण्यामध्ये जावून खूप पैसा कमावला असता… तिथे असतो तर लग्न हि कदाचित लवकर झाले असते.. ..
पण इथे राहून काहीतरी वेगळे करायचे आहे… ठसा उमटवायचा आहे… फक्त पैसा कमावणे हा उद्देश नसून… समाधान जास्ती महत्वाचे…
मुंबई मुंबई करणारे कित्येक जनी आजही १० x १० च्या रूम मध्ये राहतात…. माझ्याकडे तर चक्क १००० स्क्वे फुट चा ब्लॉक आहे.. स्वताचा…
स्वतःचा व्यवसाय आहे प्रिंटींग चा.. उत्पन्न हि बराच आहे.. म्हणजे मुलीना अपेक्षित असणाऱ्या पाच आकडी..इथपर्यंत
अजून काही जमेच्या बाजू आहेतच फक्त आम्ही राहतो महाड ला हा आमचा मुलींच्या धृष्टी कोनातून चुकीचा समाज आहे..
महाड हे खेडेगाव नाही हे आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो..
एका मुलीला लग्नासाठी कसा मुलगा लागतो ते गुण माझ्यात नक्कीच आहेत.
मी कमावता आहे, जबाबदारीची मला जाणीव आहे.. मी निर्व्यसनी आहे… समजूतदार आहे..
अजून काय लागत? मुली एकीकडे स्वावलंबी होत असताना हल्ली security सुद्धा बघतात.. मुलाचा पगार, त्याचा ब्लॉक …
आणि settle पाहिजे म्हणे मुलगा.. गडगंज पगार असलेल्या मुलाशी लग्न केला आणि मग त्याची नोकरी गेली तर काय करणार?
settlement म्हणजे काय? वाहत्या पाण्यात माती टाकली तर काय settle होते? माती कि पाणी? मग जगायचं कस तुम्हीच सांगा
वाहत्या पाण्यासारखा? कि मातीसारख ?
एवढ वाचून मला कुणी स्वीकारणार नाही पण तुम्ही एक गोष्ट तरी स्वीकारा कि महाड खेडेगाव नाही.. इथे खूप सुख सोयी आहे
मुळात बॉम्बस्फोट वगैरेचे tension नाही.. जीवाची धास्ती नाही..

पाऊसवेळ

हि पाऊसवेळ …
मनामनाच्या धरतीवर
कोसळणारी सर हि “सैल”

तन चिम्बून जाते.
मन थांबून म्हणते..
सखे साजणी मला तू मिठीत घेना नाहीतर…
सरून जाईल “वेळ”

मन मनात गाते
मन सचींब भिजते
मनामनाच्या गाभा-यात सूर उमटतो..
.”सुरेल”

ऐक साजणे…
पाऊसगाणे
हिरव्या हिरव्यारंगामधले पाणीशार ..
“अमृत वेल”

मला आवडते
हि कातरवेळ..
चिंब चिंब भिजविणारी. अशी अशी ही
‘पाऊसवेळ”

असतेस कुठे ग
जेव्हा पाऊस पडतो..
निघून जाईल सखे साजणी आयुष्याची…
“प्रेम वेळ”

वादळवाट

वादळवाटचे title साँग मी लिहिले असते तर…?

क्षण संपता संपता
क्षण नवीन उगतो
जुन्याची आठवण
नव्याचे अस्तित्व मागतो…

क्षण असता सोनेरी
हास्य छटा मनी येती..
क्षण दु:खाचे झालरी..
मन रडवूनी जाती..

मन मनात गुंफाती
क्षण सुख-दु:खाचे
पानापानातून बोलती…
नाद वादळ वाटांचे

तुला जमणारे का?

तुला जमणारे का?
पापण्या ओल्या माझ्यापासून लपवायला
तुला जमणारे का?
माझ्याशिवाय असे दूर दूर राहायला
तुला जमणारे का?
माझ्या आठवणी विसरायला
एक गोष्ट मात्र तुला नक्की जमेल..
तुला जमणारेय माझ्यासाठी अश्रू ढाळायला
अश्रू आले म्हणजे
त्यातून खर प्रेम ओथम्बेल ..
जरा वेळ ते आधी
पापणी आडच थांबेल..
मग विचारेल हृदयाला..
कि जावू का गालावर?
विरह दिसतोय स्पष्ट मला..
तुझ्या भाळावर….

चंद्र

चंद्राचीच प्रतिमा आहे
तुझ्या चेह-यात
चंद्राचीच शीतलता आहे
तुझ्या नजरेत
प्रसंगी चंद्राचीच कोर आहे
तुझ्या पापणीत
चंद्राचीच शालीनता आहे
तुझ्या वागण्यात
चंद्राचीच अमावस्या आहे
तुझ्या विरहात
या प्रसंगी
चंद्र तू आहेस…
माझ्या आयुष्याचा..
प्राण मनुष्याचा जसा…
बाण धनुष्याचा जसा..

फक्त

फक्त हसावस तू , माझ्या हृदयात बसावस तू
मी हाक मारली तर, माझ्याजवळ असावस तू

फक्त आठवावं तूला , डोळ्यात साठवावं तुला
रुसून कधी बसलीसच , तर मनवाव तुला

फक्त साद दे मला, मी हाक मारली तर
शपथ मला तुझी, वाट वेगळी धरली तर

फक्त तुझा सहवास असावा, मनी मर्मबंधाचा ठेवा
‘प्रेमा’लाही वाटायला हवा, अपुल्या जोडीचा हेवा

फक्त मीच का लिहावी, तुझ्यासाठी हि कविता?
तू हि काही लिहून पाठव, झ-यासाठी जशी वाहते सरिता

तीच होती

रात्रीला असावे कोणी आसवे पुसाया .
डोळे मिटले तरी डोळ्यात दिसाया …

जशी मिठी बावरते बाहुपाशामध्ये
घट्ट मिटतात देह दोन जिवामध्ये…

पहाट गडद …गात्र अस्ती अस्ती सैल
घामाघूम अंग स्नान घेवून सचैल …

दूर होता होता धागे अदृष्यसि होती
समीप त्या क्षणी सोबतीला तीच होती…

.