नाही..

निशा सरली नाही… झोप हि उरली नाही…

नीज गेली कुठे कळेना…कुशीतही शिरली नाही….

शोधूनही सापडेना… तरीही बोध होईना 
हि शोधायची सवय अजून का संपली नाही..

दिशा सापडे तरीही… मंजिल का लांब जाते…
चालण्यासाठी एकही आता वाट उरली नाही….

खोदून ढिगारे वाढे.. खड्डाही खोल वाढे…

खड्डा बुजावाया खाली माती उतरली नाही.

लागावा म्हटले आता तरी हिशोब हा लागेना 
मोजण्यासारखी आता शिल्लक उरली नाही..

वेळ सरताना

युग भासती मजला..

वेळ सरताना

युग क्षणासारखे 
तू इथे असताना 
गुज सांगतो हा वारा 
रानी फिरताना 
तुझ्या डोळ्यात पाहीला
श्रावण झरताना..
 
तुझ्या पायात वाजती 
पैंजणे चालताना..
छन छन नाद होई..
मला छळताना  ..

 

तुझे क्षितीज दिसले 
नभ शोधताना…
प्रीत चांदणी पहिली 
मी तारे बघताना…  
 
उसळले काही देही..
तुला स्मरताना…
आठवांचे वादळ ते 
आत आत शिरताना…
 
दु:ख हस्ते रे तुला 
काटे टोचताना 
सुख शोधतेच मला
फुले वेचताना…

आता…

तुला टाळतो..आरसाही आता…
देत नाही तुझा भरवसा आता….

सोडल्या क्षणानाही..आठवूनी..
डोळ्यात पावूस येत नाही आता..

भेटलेल्या…वाटलेल्या…अनुभूतींचे..
विखुरले तुकडे गोळा करतो आता..

पाहुनी मनाला मनाशी बोलतो मी…
सांगणेही नजरेने होत नाही आता…

सुख दु:खांचेही ..बांधले गाठोडे आहे
ओझे त्यांचे पेलवत नाही आता

मेघ रे मेघ रे

मेघ रे मेघ रे… आले कसे दाटुनी…
येताना थेंब सारे सगळ्यांना वाटुनी..
वाहणा-या झ-याचे …भिजलेल्या वा-याचे 
हे दृश्य साठवावे …कुणी तिजला पाठवावे..
ते थेंब आठवांचे.

तुझ्या चाहुलीचे छनछन छनछन पैंजण वाजे…
थरथरले…भिरभिरले…बावरले मन माझे..
पांघरून शाल प्रीतीची… होवुनी चिंब कुणी लाजे..
गदगदले, मन तरसे ..तुजसाठी तिन्हीसांजे..

गाताना ओठी येती…तुजवरच्या काही ओळी..
काळजात कोरल्या होत्या मी विरहाच्या वेळी 
हा पाऊस आला पुन्हा अन दटावूनी मज गेला..
अश्रुना सांगून गेला…थेंबातून रांगून गेला…

मेघ रे मेघ रे

मेघ रे मेघ रे… आले कसे दाटुनी…
येताना थेंब सारे सगळ्यांना वाटुनी..
वाहणा-या झ-याचे …भिजलेल्या वा-याचे 
हे दृश्य साठवावे …कुणी तिजला पाठवावे..
ते थेंब आठवांचे.

तुझ्या चाहुलीचे छनछन छनछन पैंजण वाजे…
थरथरले…भिरभिरले…बावरले मन माझे..
पांघरून शाल प्रीतीची… होवुनी चिंब कुणी लाजे..
गदगदले, मन तरसे ..तुजसाठी तिन्हीसांजे..

गाताना ओठी येती…तुजवरच्या काही ओळी..
काळजात कोरल्या होत्या मी विरहाच्या वेळी 
हा पाऊस आला पुन्हा अन दटावूनी मज गेला..
अश्रुना सांगून गेला…थेंबातून रांगून गेला…