आहे मी?

हरवत जातो आहे मी, भटकत जातो आहे मी
मला न सापडे माझा मी..असा कसा आहे मी..

गोंधळ उडतो फार मनाचा, हे करावे कि ते करावे..
सल्ले अनेक.. वास्तवाचे फेक.. झेलत जातो आहे मी..

भ्रमात राहू नकोस राजा, असा इशारा करते नियती..
मृत्यूचेही आता भय नाही… अशा निद्रेत आता आहे मी…

कुठेहि जावे लक्ष्मी च्या मागे, धावत आहे हि दुनिया..
समाधान ते हवे असे मज..शोधात बसलो आहे मी..

सुखाची मज न आस वेड्या.. दुखाचे धागे जपतो रे.
अश्रुना त्या पिऊन अलगद नेत्र कोरडे पुसतो आहे मी..

गेली लाकडे अर्धी अधिक.. आता मागणे नाही काही सुदिक..
आत्म्याला धीर देत देत थांबायला सांगत आहे मी