आता झाले आहे खूपच उन.. उनही जात नाही आयुष्यातले..
उन्हालाही वाटते आहे बरे इथे माझ्या आयुष्यातील उन बघायला..
माझी काहिली होत आहे.. उन्हाने आणि तुझ्या नसण्याने सुद्धा..
उन मात्र अजून तळपतो आहे तेजाने… आनंदला आहे त्याच्यातला आगीचा गोळा सुद्धा..
बहुतेक मुक्कामाला आहे उन कायमचे… पावसाचे आभूट हि पडत नाही अधून मधून..
वळवाच्या पावसासारखे.. गार गार वारासुद्धा नावालाच आहे हो..दिसत मात्र नाही..कधीपासून..
संध्याकाळ होतेच आहे.. रोजासारखी… वाटते जरा आकाश भरल्यासारखे….
वारा येतो उडवून नेतो ते हि ढग., शिल्लकच राहत नाही काही पावूस पडण्यासारखे…
ऊन – पाऊस