तीच होती

रात्रीला असावे कोणी आसवे पुसाया .
डोळे मिटले तरी डोळ्यात दिसाया …

जशी मिठी बावरते बाहुपाशामध्ये
घट्ट मिटतात देह दोन जिवामध्ये…

पहाट गडद …गात्र अस्ती अस्ती सैल
घामाघूम अंग स्नान घेवून सचैल …

दूर होता होता धागे अदृष्यसि होती
समीप त्या क्षणी सोबतीला तीच होती…

.

केमिस्ट्री

तिने पहिले आम्हाला
तेव्हा झाला आमचा कलिजा खलास
इतके वर्ष जो मिळवीत होतो फर्स्ट क्लास
आता मिळतोय जेमतेम पास क्लास
तिच्यात विचारात तिच्यात आठवणीत,
आठवणींचा डेड स्टोक वाढतोय साठवणीत
तिची माझी केमिस्ट्री का जुळत नाहीये?
माझ्या नजरेतील प्रेम तिला का कळात नाहीये?
अभ्यासात मिळत होते जे यश
ते इथे का फळफळत नाहीये?
कदाचित तिला माझ्या प्रेमाची
रासायनिक संज्ञाच कळात नाहीये

सांगा तिला कोणीतरी कि लाव केमिस्ट्री चा क्लास
तू हि होशील पास अन मलाही प्रेमात मिळेल फर्स्ट क्लास…

तुझी कविता आहेच

तुझी कविता आहेच सुरुवात एका क्रांतीची…
कल्पनेच्या दुनियेतील शब्दाच्या भ्रमंतीची..

तुझी कविता आहेच एक हवीहवीशी चाहूल
हृदयाच्या उंबरठ्यात येवू पाहणारे पावूल

तुझी कविता आहेच सुख-दुखाची एक दोरी
आपल्या नात्याला अलगद बांधून ठेवणारी