तुझ्या त्या

तुझ्या त्या आसवांचा एक वेगळाच स्वाद होता
अपुल्याच विरहाचा डोळ्यातील नाद होता

तुझ्या त्या नयनांची एक वेगळीच दृष्टी होती
त्यात दडलेली अपुल्या प्रेमाची हिरवीगार सृष्टी होती

तुझ्या त्या हसण्याची एक वेगळीच अदा होती,
माझ्या ‘तुझ्यावरील प्रेमावर ‘ ती सदोदित फिदा होती

तुझ्या त्या केसांना एक वेगळेच वळण होते
वा-याच्या मंद झुळकेला ते नेहमीच शरण होते..