तेव्हा

तेव्हा होती तुझी साथ आता विरहाची बरसात
हल्ली मन कोरडे राहते मुसळधार पावसात…

आता तुझा आवाज कानी प्रतीध्वनिसारखा
थोड्या वेळाने तो हि होत जातो पारखा

जरा कुठे जावे तुझ्या आठवणींपासून दूर..
पुन्हा तिथेच नेतो मला स्वप्नांचा चक्काचूर

नाही का?

सगळ्या कौशल्यासाहित आपण जन्माला येतो,
सगळा मटेरियल पूर्णपणे आत असत जन्माला येतो तेव्हा
पण कुठले कौशल्य आपण कसे प्रगत करतो, त्याला
पैलू कसे पडतात त्यानुसार एखादी कला, कौशल्य पुढे विकसित होते,
त्यात आपला रस असणे अत्यावश्यक असते,
एखाद्या कामाचा आनंद घेत घेत काम केले तर त्याचे
समाधान जास्त असते..
पैसा हि माणसाची किमान गरज आहे,
माणसाची खरी कमाल गरज हि समाधान आहे..
माणसं नेमके उलट करायला जातात
नाही का?