कोथरूड ला एक प्रदर्शन होते… मातीच्या pots चे.. आकार pot art म्हणून मित्राचे
एक workshop आहे इथे रायगड मध्ये. त्या प्रदर्शनात स्पंदन चारोळी संग्रह
होते विक्रीसाठी…. आणि चक्क तिथे मंगेश तेंडूलकर नावाची हिमालायासम व्यक्ती आली होती..
त्यांनी माझे पुस्तक घेतले… आणि कधीतरी दुपारच्या वेळी एक पत्र माझ्या हाती आहे…
ते त्यांचे होते.. वेळ असेल तर वाचा ते पत्र….
आत्म्याची हत्या..
कुणी सांगावे न त्यांना तुम्ही कुसकरू नका..
पुन्हा पुन्हा करू नका..गळ्या दोरीच्या आणाभाका.
आता करी काय करी..स्पर्धा गळ्याशी आलेली..
पालकांची स्वप्ने जुनी त्यांनी मुळात पाहिलेली..
पाहिलेली स्वप्ने त्यांनी त्यांच्या मुलां मधी पहिली..
त्याले पूर्ण करण्यासाठी त्यांनी शाळेला धाडली…
कधी केल नाही माहिती.. कधी केला नाही पत्ता
कि मुलाला हवा असतो कुठल्या दिशेचा रस्ता
कसा काय बी करावा… अन गुनामाधी पहिला यावा
इतकी इच्छा ती त्यांची त्यासाठी बिचा-यांचा जीव जावा..
शर्यतीत धाडुनी एकदा हरला कि पोर
अश्रू डोळ्यामंदी येती न जीवाला लागे घोर
हाती होता तो बी चालला..हा कुठला खेळ चालला
चालणारा खेळ चाले… त्यातला खेळाडू थांबला..
मंद मंद हालचाली.. नि शेवटचे डोळे मिटती..
धागे अदृश्य होवुनी… पापण्यांखाली लपती..
कुठे जावून पोचले.. स्वप्न उराशी धरले..
चिमुकले पाखराने देवाघरचे रास्ते धरले..
आता देवाघरी तो अन देवघरापाशी माझी विनंती
त्याला भेटायला येईन तोवरी ठेव आसमंती…
एक सांगावेसे वाटे…
आत्महत्या करणे हे भ्याडपणाचे आहे लक्षण..
त्यावर एकाच उपाय ते म्हणजे आत्मपरीक्षण…
स्वताचे नि पालकांचेही……….
स्पर्श हव्या हव्याशा नात्याचा..
तू फक्त हो म्हण..!
गुलाबच फुल हे प्रेमाचे चिन्ह
ते तुला कस द्याव हे माझ्यापुढे प्रश्नचिन्ह
म्हणूनच हा मागणी पत्राचा प्रपंच..
तू फक्त हो म्हण..! – १
पाऊस आणि जमीन यांचे किती सुंदर प्रेम
जमीन झेलायला आतुर पावसाचा प्रत्येक थेंब…
माझ्या जीवनात तू पावसासारखं बरासव..
त्यासाठी मी रात्रंदिवस तरसावं…
तू बरसण्यासाठी नि मी तारासंयासाठी
एकाच गोष्ट आवश्यक आहे…
ती म्हणजे…
तू फक्त हो म्हण..! – २
तुझ माझ्या आयुष्यात येण म्हणजे
चंद्राला पौर्णिमा लाभण्यासारख आहे..
पण त्यासाठी त्याला महिनाभर प्रतीक्षा करावी लागते…
माझ्या प्रतीक्षेचा काळ तर
तुझ्याच हातात आहे…
तू फक्त हो म्हण..! – ३
तुला काय सांगायचं ते तुझ्या
नजरेतून कळत ..
हल्लीच्या E -mail पेक्षा ते
जास्त वेगाने मिळत…
पण प्रेमाची प्रत्यक्ष कबुली मिळाली तर
फारच बर होईल..तेव्हा please
तू फक्त हो म्हण..! – ४
भाव बंधन रेशमाची
त्याला जोड संयमाची
तुझ्या होकारानेच लिहू शकेन मी
अडीच अक्षरे प्रेमाची…
म्हणून..
तू फक्त हो म्हण..! – ५
एक लावणीचा प्रयत्न.
माझे डोळे लाजुनी मिटले
डाळिंब गुलाबी ओठात हसले…
काळजाचे दार उघडले..
अन प्रीतीत पावूल पडले..
अशी नजर रोखली तुम्ही…
वळख जुनी काढली तुम्ही…
बाण उरी घुसला परी…
घायाळ झाला कि तुम्ही…
आता जावा.. परती यावा…
किवा निरोप धाडुनी द्यावा..
वाजे पावा बोले रावा
अन भरजरी शालू नवा…
चोळी तंग…करती संग…
जाळ-जाळिती माझे अंग..
मनी माझ्या उडती रंग
गाली गुलाबी आला हा रंग…..
शुभेच्छा
आधी माफी मागतो… कि इतके दिवस गायब होतो त्याबद्दल
आधी बिझी होतो मग रस्त्याचे काम सुरु असल्याने फोन लाईन उखडली होती त्यामुळे नेट चालू नव्हते..
तुम्हाला सर्वाना नवीन वर्षाच्या आणि संक्रांतीच्या शुभेच्छा…
तिळगुळ घेवून ब्लोग गोड गोड लिहावा आणि गोड गोड वाचून गोड गोड प्रतिक्रिया द्यावात/./ हीच शुभेच्छा
बाकी आता काय लिहावा काळात नाहीये.. म्हणजे सुचत नाहीये
मन शांत असेल कि सर्व काही सुचत…
नुकताच एक चित्रपट पहिला
थ्री idiots … तुम्ही हि बघितला असेलच.. नसेल तर बघा…
गेल्या १० वर्षातील सर्वोत्तम चित्रपट आहे असे माझे स्वताचे मत आहे…
एखादी पटकथा strong असेल आणि दिग्दर्शकाने प्रत्येक व्यक्तिरेखेला नीट मार्गदर्शन केले आणि कलाकाराने योग्य तो न्याय भूमिकेला दिला
कि साधी गोष्टही परिणामकारक रित्या दाखवता येते…
खूप काही शिकण्यासारखे आहे.. त्या चित्रपटातून… गंभीर विषय अतिशय मार्मिक पणे आणि विनोदाच्या अंगाने सांगितला आहे.. त्यातील चित्रपटपाहताना
चित्रपट गृहातील हशा तिथेच ठेवला आणि मनातून खूप खोलवर विचार केला तर आपणच आपल्याला नव्याने गवसू असेही मला वाटते…
किती तरी जन असेल आहेत जे engineer झालेत आणि आता software क्षेत्रात काम करीत आहेत.. म्हणजे शिक्षण आपण एक घेतो आणि अर्थार्जन करण्यासाठी दुसरे क्षेत्र निवडतो…
आपली स्वताची दिशा आधी ठरवली जात नसल्यामुळे असे होते. मी हि वाणिज्य शाखेचा पदवीधर आहे.. पण आता प्रिंटींग क्षेत्रात आहे… संगणक चालवतो. designs बनवतो… लिहितो…
हेच मला आधी गवसले असते तर… किवा त्यावर विचार करून मीच तो मार्ग आधी निवडला असता तर मला त्या मार्गातील mile stone कदाचित आधीच मिळाले असते…
असो…..
तेव्हा नाही तर आता तरी…. इथून पुढे जास्त concentration आवडत्या क्षेत्रात करायचे..जेणेकरून आपण किती लांब जावू शकतो…. याचा अंदाज येईल.
आता नवीन वर्षात एवढेच लिहून थांबायचे नाही…. खूप लिहायचे आहे, चिंतन करायचे आहे…
एकंदरीत… आपण आपल्यातील बदलाने एक इंच तरी आपल्या आजूबाजूचा परिसरातील वैचारिक बदल घडवू शकतो… काहीतरी उदाहरण समाजापुढे ठेवू शकतो..
संस्कृतीची जपणूक करताच वर्तमानातील गोष्टीना, आव्हानांना स्वीकारत… योग्य त्या निर्णय प्रक्रियेतून समर्पक फळ कसे मिळेल याचा निदान प्रयत्न तरी करू शकतो….