दुसरं नाव

प्रेमाचं दुसरं नाव सहवास
सहवासाचं दुसरं नाव विश्वास
विश्वासाचं दुसरं नाव भावनांचा प्रवास
त्या प्रवासाचं दुसरं नाव उमलत्या फुलांचा सुवास
फुलांच्या सुवासाचं दुसरं नाव भ्रमरांचा अट्टाहास
भ्रमरांच्या अट्टाहासाच दुसरं नाव प्रीतीचा श्वास
प्रीतीच्या श्वासाचं दुसरं नाव ध्यास
ध्यासच दुसरं नाव मी
आणि माझं दुसरं नाव तू.