पाऊस नवा…!


पाऊस नवा……… पाऊस हवा..
प्रत्येक ढगात… आठवणींचा थवा ..

पाऊस पायवाट… पाऊस हिरवळ..
मातीतून सुटलेली सुगंधी दरवळ..

पाऊस जरासा.. पाऊस भरोसा..
आठवणीच्या पागोळीस …जरासा दिलासा..

पाऊस दिशा.. पाऊस आशा
सरींच्या नशेत…धुंदल्या दिशा..

पाऊस नदी… पाऊस झरा…
पाना-पानातून वाहणारा गार वारा…

पाऊस तुफान.. पाऊस दर्याला उधाण..
उसळत्या लाटांना… प्रेमाची आण..

पाऊस शांत… पाऊस चिंब..
डोळ्यात भिजलेले तुझे प्रतिबिंब…

पाऊस तू.. पाऊस मी…
जगण्याच्या उत्साहाची…आल्हाददायक हमी..

4 thoughts on “पाऊस नवा…!

  1. kya baat hai Mitra…!!! Pahilya pausat bhijalyavar vatnara tajelpana ahe kavite madhe..!!!
    जगण्याच्या उत्साहाची…आल्हाददायक हमी..!!! Chan vatal bharbharun vahanara POSITIVE vichar..!!!! Good.. Keep it up..

    Tu mala taji taji kavita dilis… mi tula taji taji pratikriya dili…!!! 😀

  2. …………… पहिला पावूस ………..
    पहिला पावूस आला
    मनाला फार आनंद झाला
    वाटलं मनसोक्त भिजावं
    पण ….. आईच्या ओरडण्याचा आवाज आला ……….!! १ !!

    बघता बघता सरी कोसळू लागल्या
    वारा सुसाट वाहू लागला
    हाताने पावसाचे थेंब उडवताच
    रागाने ढग कसा पाहू लागला …………….!! २ !!

    नकळत येवून कोसळू लागला
    क्षणात थंडगार वाटे मनाला
    पाहते येताना पाहिलेला सूर्य
    कुठे कसा नाहीसा झाला …………!! ३ !!

    झाडे वेळी हलू लागली
    मातीलाही छान सुगंध आला
    पक्षीही आता होतील गोळा
    भरेल तेव्हा कावळ्यांची शाळा …………..!! ४ !!

    नद्या नाले आता वाहू लागले
    इंद्र – धनुष्य आकाशी आला
    डबक्यात होडी सोडायला
    आई भिजू दे ना ग पावसात मला ……………!! ५ !!

    कवी :- रविंद्र पाटील
    ९७६८९६३६८६

Leave a reply to SHASHIKANT PATIL उत्तर रद्द करा.