सुन्न झाले मनाचे किनारे, इकडून तिकडे वाहे दुख सारे
विरहाची आठवण ताजी तजेली, तुझ्यावाचून सुन्न चंद्र हि अन तारे
दुरावा परी मिट्ट तीमिरापारी, आणोनी मज द्यावे दिव्यांचे सहारे
प्रकाशात त्या मी हि हरवून जाईन, तुझ्याच आठवांचे घेवून सोयरे
रुक्ष सुरांची मैफिल जमते, सुखांचे कवडसे त्यापुढेहि नमते
होवुनी जावी अशी भैरवी ती, साक्षीला असावे नक्षत्र तारे
मिटोनी पापणी वाहे अश्रूंची धार, ओघळती परी थांबती कपोली थेंब दोन-चार
त्यांना टिपून माझिया अनामिकेने, मी दुखाला स्वतःच सावरे..
tuzaa blog chaan aahe…kavitaa pan ekdam uttam…asech lihit raahaa. shubhechha !!!
Girish kulkarni