एक चांदण्या मनाला होती चंद्रकोराची ग प्रीत,
चंद्रकोराच्या रुपाची अनोखी होती रीत…
रोज अनोखे रूप, रोज अनोखे लावण्य,
त्याच्यापुढे ‘तिला’ होते सारे – सारे नगण्य
त्याची पौर्णिमा झालेली त्याने भरून पहिली..
प्रकाशाची मळवट तिने माथिया लाविली..
रूप खालावत गेले, तसे काहूर दाटले,
एक ‘सावित्रीचे’ भाल असे पांढरे पडले
तरी प्रेमाची ‘संगत’ हर एक राती होती..
आता ‘त्याचे-तिचे’ प्रेम शत तारकांच्या ओठी…
छान प्रयत्न आहे. कविता आवडली. पोलची साईज कमी करावी ती पेजच्या बाहेर जात आहे.
polvar vote karayacha prayatn kela pan jamale naahi.
poll adhi tithe display karayala khup kashta jahle ahet…. ata to vyavasthit aat basaava yasathi prayant suru ahet. lavkar karto…..
polvar kuthle button press karnar hotat te sanga. mhanje poll kelyasarkhech ahe nahi ka?
size kami keli ahe poll chi… tevadhi pure na?
छान केले आता बटन दाबतो. आणि आणखी एक विनंती आहे अरे मराठीत लिहित जा की! http://www.google.com/transliterate/indic/Marathi ही जी लिंक दिली आहे यावर व लाईन असतांना इंग्रजीत टाईप करायचे स्पेस बर दाबला की त्याचे मराठीत रुपांतर होते. बघ प्रयत्न करून.