प्रश्न मंजुषा

1.Where is your cell phone?
जवळच आहे… पण शांत मोड मध्ये आहे..

2.Your hair?
लहान केले तर निवासारखे, तेल लावले तर छावासारखे

3.Your mother?
माउली

4.Your father?
न भरून येणारी पोकळी

5.Your favorite food?
१ मिसळ ३ पाव..

6.Your dream last night?
मी रात्री विचार करतो दिवसा बघितलेल्या स्वप्नाचा..

7.Your favorite drink?
चहा

8.Your dream/goal?
आपल्या भोवातालाच्या माणसांच्या चेह-यावर हसू कायम ठेवणे..

9.What room are you in?
ऑफिस

10.Your hobby?
कविता.. क्रिकेट.. मित्रांसोबत गप्पा.

11.Your fear?
एकटेपणाची… सध्या ‘भीतीच’ आहे…

12.Where do you want to be in 6 years?
१ सख्खी बायको असावी.. आणि दोन गोंडस मुले ( १ मुलगा , १ मुलगी)

13.Where were you last night?
स्वताच्या घरी

14.Something that you aren’t diplomatic?
चहा प्या… कुणाला दुखावणे नाही.. आणि आपले दुख कुणाला दाखवणे नाही..

15.Muffins?
काजू कतली, वगैरे सर्व गोड पदार्थ..

16.Wish list item?
सर्वांसाठी सुखी जीवन..

17.Where did you grow up?
महाड

18.Last thing you did?
पाव भाजी खाल्ली..

19.What are you wearing?
पांढरा शर्ट (एकदम राजकारणी वाटतोय )

20.Your TV?
आहे न… tatasky लगाया है. तो लाईफ जीन्गालाला …

21.Your pets?
मनातले विचार पाळणे…

22.Friends
अजातशत्रू

23.Your life?
घडतंय उसमे सुख मानते है हम ….

24.Your mood?
फारसा खुश नाही.. रात्र फार खाते मला..

25.Missing someone?
हो. बाप आणि जिच्यामुळे मी बाप होवू शकतो अशी व्यक्ती..

26.Vehicle?
passion plus दुचाकी आहे.. अजून ४ हफ्ते जायचे आहेत लोनचे

27.Something you’re not wearing?
स्वार्थ..

28.Your favorite store?
रूप संगम

29, Your favorite color?
पांढरा आणि काळा … ते हि रंगच आहेत पण त्यांना ब्लक नि व्हाईट का म्हणतात नि कलर
वेगळे असे का म्हणतात तेच काळात नाही..

30. When was the last time you laughed?
तसा मी हसतच असतो…. सगळ्यांच्यात असलो कि

31. Last time you cried?
what to do when tears are dried

32. .Your best friend?
चांगले खूप मित्र आहेत…

33. One place that you go to over and over?
बाथरूम

34. One person who emails me regularly?
मित्र जास्त मैत्रीणी कमी आणि matrimonial sites

35. Favorite place to eat?
जिथे चांगलं खायला मिळेल, ती कुठलीही.

अनमोल प्रतिक्रिया..

कोथरूड ला एक प्रदर्शन होते… मातीच्या pots चे.. आकार pot art म्हणून मित्राचे
एक workshop आहे इथे रायगड मध्ये. त्या प्रदर्शनात स्पंदन चारोळी संग्रह
होते विक्रीसाठी…. आणि चक्क तिथे मंगेश तेंडूलकर नावाची हिमालायासम व्यक्ती आली होती..
त्यांनी माझे पुस्तक घेतले… आणि कधीतरी दुपारच्या वेळी एक पत्र माझ्या हाती आहे…
ते त्यांचे होते.. वेळ असेल तर वाचा ते पत्र….

बेपत्ता पुत्राच्या शोधात आधुनिक हिरकणी आणि प्रामाणिक हेड कोन्सटेबल

बेपत्ता पुत्राच्या शोधात आधुनिक हिरकणी आणि प्रामाणिक हेड कोन्सटेबल

बेपत्ता मुलाचा शोध लागत नसल्याने व त्याचेशी मोबाईल वरून संपर्क होत नसल्याने, मुंबई – गोवा महामार्गावर भर मध्यरात्री एकटीच स्कुटरवरून निघालेली धाडसी माता आणि तिला अनमोल सहकार्य करणारा महाड चा प्रामाणिक हेड कोन्सटेबल यांची हाती आलेली कहाणी आधुनिक हिरकणीची आठवण करून देणारी आहे.. या मातेस अनुभवास आलेली तिच्या राहत्या गावातील पोलीस खात्याची निष्क्रियता संताप आणीत असतानाच महाडच्या एक सर्वस्वी अनोळखी पोलीस हेड कोन्सटेबलने दाखवलेले अनन्य साधारण प्रमानिक्पण मात्र आपणास थक्क करून टाकते. हि घटना चित्रपटाला शोभेल अशीच, पण ती सर्वार्थाने सत्य अशी आहे.आणि गेल्या ११ डिसेंबर ला गोवा महामार्गाच्या प्रवासात घडलेली..

मातृत्व, धाडस आणि प्रामाणिकपणा यांना आजच्या जगात एक आगळा आयाम मिळवून देणा-या या वास्तव घटनेतील हि ‘आधुनिक हिरकणी माता’ म्हणजे डोंबिवली मधील interior Decoratorश्रीमती बिना ठक्कर तर महाडचा प्रामाणिक पोलीस म्हणजे वाहतूक पोलीस चौकीतील हेड कोन्सटेबल प्रमोद कृष्णा माने.
११ डिसेंबर ला विक्रम आपल्या आल्तो मारुती कार ने गोव्याला जाण्याकरिता दोम्बिविलीतून घरून सकाळी दहा वाजता निघाला. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास श्रीमती बिना ठक्कर यांनी त्याची चौकशी करण्यसाठी मोबाईलवर फोन केला. मोबाईल बंद होता. नेटवर्क नसेल असा विचार करून श्रीमती ठक्कर यांनी तासाभराने पुन्हा फोने लावला. फोन लागला नाही. विक्रमाचे वडील त्यावेळी पुण्यात होते. घरात श्रीमती ठक्कर आणि त्यांची कन्या असे दोघेच होते.. सलग तीन-चार तास असाच प्रकार घडल्यानंतर मातेच्या मनात चिंतेची पाल चुकचुकली. गोवा राष्ट्रीय महामार्गावर घडणा-या वाहन अपघातांच्या बातम्या डोळ्यासमोर येताच अस्वस्थतेत आणखी भर पडली. अखेर त्यांनी डोम्बीविली पोलीस स्टेशन घातले. सारा प्रकार सांगून माझ्या मुलाचा ठाव ठिकाण शोधून काढण्यास सहकार्य करा अशी विनंती केली. त्यावर ‘चोवीस तास थांबा’ असे टिपिकल उत्तर डोम्बीविली पोलिसांकडून मिळाले.
संध्याकाळ सारून रात्र होवू लागताच पुत्राविशायीच्या अस्वस्थतेत आणखी वाढ होवू लागली. त्या मातृत्वाने अखेर एक धाडसी शोध मोहिमेचा विचार मनात पक्का केला आणि कन्येला घरात एकटेच ठेवून रात्री बारा वाजता विक्राळा शोधण्यासाठी घर सोडले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मुलाची गाडी कुठे दिसते का याचा शोध घेत होंडा स्कूटर वरून त्यांचा प्रवास सुरु झाला. रात्री दोन वाजता त्या पनवेल ला पोहोचल्या. रस्त्यावरच्या वाहतूक पोलिसांना शंका आली. आश्चर्य वाटले. त्यांनी त्यांना थांबवले. मुलाच्या शोधतील मातृत्वाची कथा ऐकून घेतली आणि सांगितले. ‘तुम्ही इथेच थांबा, पुढे एकट्या महिलेने जाणे योग्य नाही’. परंतु ठक्कर यांचे मन समाधान करून घ्यायला तयार नव्हते. त्या कर्नाळा खिंड, हमरापूर, पेण, रामवाडी असा शोध घेत वडखळ नाक्यावर पाहते पाच वाजता पोहोचल्या. तिथेही विचारणा झाली, एकटीनेच स्कुटरवरून पुढे जावू नये असेही सांगण्यात आले. पण तुमच्या मुलाला आम्ही शोधून काढतो, असा विश्वास मात्र कुणीही दिला नाही.
वडखळ हून त्या पोचल्या सकाळी दहाच्या सुमारक महाड शहर जवळच्या वाहतूक पोलीस चौकीत, पोलीस हेड कोन्सटेबल प्रमोद कृष्णा माने तिथे एकटेच होते. त्यांनीही आस्थेने ठक्कर यांची कहाणी ऐकून घेतली. पुढच्या मार्गावर सर्व पोलीस ठाण्यांना कळवू, तुम्ही पुढे जावू नका असे सांगितले. पण पनवेल, वडखळ मधील पोलिसांप्रमाणेच हे असावे असा समाज करून घेत ठक्कर पुढच्या शोध मार्गावर निघाल्या.

महाड जवळच्या कामात हॉटेल मध्ये चहा घेण्यासाठी थांबल्या असताना आपली पर्स आपल्याकडे नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. पर्स महाड वाहतूक पोलीस चौकीत राहिली असावी अशी शंका आल्याने त्या परत मागे आल्या. वाहतूक पोलीस चौकीत हेड कोन्सटेबल माने एकटेच होते. ठक्कर परत आल्याचे पाहताच त्यांनी तत्काळ त्यांची पर्स काढून दिली. ठक्कर यांचा जीव भांड्यात पडला. कारण त्या पर्स व्यतिरिक्त कोणतेही पैसे त्यांच्याकडे नव्हते आणि पर्स मध्ये होते सुमारे सात लाखांचे मौल्यवान सोन्याचे दागिने.
माने यांच्या प्रमानिक्पानामुळे सारेच सारखे नसतात, असा पोलीसंविशायीचा त्यांचा ग्रह तर दूर झालाच पण मुलाला अपघात झाला असेल तर त्याला तत्काळ मदत मिळावी या उद्देशाने सोबत घेतलेले दागिने सारेच्या सारे परत मिळाल्याने त्या थक्क झाल्या. पोलीसंप्रतीचा एकास तर दूर झालाच उलट सन्मानाने सलाम ठोकण्यास पोलीस पात्र आहेत अशीच त्यांची भावनाबनली.
महाधून निघून पुढे कशेडी घात, खेद, चिपळूण, कणकवली करत ठक्कर यांनी १२ डिसेंबर रोजी चार वाजता सावंतवाडी घातले आणि नेमका तिथेच तो अतुअछ्य आनंदाचा क्षण जुळून आला. गोव्यातून विक्रमाचा मोबाईल वर फोन आला. विक्रमाचा आवाज ऐकला मात्र त्यांचा सारा क्षीण एका क्षणात निघून गेला. मन आणि डोके चिंतामुक्त झाले. विक्रम च्या मोबाईल ची battery संपली होती. चार्जर सोबत नव्हता. परिणामी त्याचा फोन बंद होता. तो सुखरूप असल्याचे त्याला माहित होते, पण आईला कळले नव्हते. शेवटी ते कळले. मुलगा भेटल्याचा आनंद तर होताच, पण त्याहीपेक्षा महत्वाचा होता तो महाडचे पोलीस हेड कोन्सटेबल प्रमोद कृष्णा माने यांच्या प्रामाणिकपणाने झालेला आनंद.
बक्षिसापोटी देवू केलेली रक्कमही माने यांनी विनम्रपणे नाकारल्याने मला मोठे बाल मिळाले. तुम्ही त्यांची बातमी फोटोसह द्या, माझा फोटो नको. सर्वांपर्यंत त्यांच्या प्रामाणिक पण पोचावा, हा या ‘आधुनिक हिरकणी मते’ ने विनंतीपूर्वक दिलेला निरोप प्रसिद्धीसाठी झपाटणा-या सर्वाना मोठा आदर्श वस्तुपाठ घालून देणारा ठरावा.

बातमीदार – जयंत धुळप (अलिबाग)
सौजन्य : लोकसत्ता, दिनांक २२ डिसेंबर २००९

या लेखाचे वाचन झाल्यावर काही प्रश्न मनात डोकावातीलाही पण त्यातील प्रामाणिकपणाचे उदाहरण सर्वांपर्यंत पोहोचावे हाच उद्देश..

आपण सर्व यावर चर्चा करू शकतो…