वेळ सरताना

युग भासती मजला..

वेळ सरताना

युग क्षणासारखे 
तू इथे असताना 
गुज सांगतो हा वारा 
रानी फिरताना 
तुझ्या डोळ्यात पाहीला
श्रावण झरताना..
 
तुझ्या पायात वाजती 
पैंजणे चालताना..
छन छन नाद होई..
मला छळताना  ..

 

तुझे क्षितीज दिसले 
नभ शोधताना…
प्रीत चांदणी पहिली 
मी तारे बघताना…  
 
उसळले काही देही..
तुला स्मरताना…
आठवांचे वादळ ते 
आत आत शिरताना…
 
दु:ख हस्ते रे तुला 
काटे टोचताना 
सुख शोधतेच मला
फुले वेचताना…