आता…

तुला टाळतो..आरसाही आता…
देत नाही तुझा भरवसा आता….

सोडल्या क्षणानाही..आठवूनी..
डोळ्यात पावूस येत नाही आता..

भेटलेल्या…वाटलेल्या…अनुभूतींचे..
विखुरले तुकडे गोळा करतो आता..

पाहुनी मनाला मनाशी बोलतो मी…
सांगणेही नजरेने होत नाही आता…

सुख दु:खांचेही ..बांधले गाठोडे आहे
ओझे त्यांचे पेलवत नाही आता