पाहिले तुला ज्या नजरेने…
ते भरले अश्रुने आता…
गहिवरले मन..जे
तुझ्या भेटीने भारावले होते….
स्पर्श हाताचा…आठवतो…
रिक्त ओंजळी पाहताना..
बोथट झालेल्या संवेदना हि
टोचत राहतात रात्री जागताना…
विरहाचा माग काढता काढता …
भेटते आपली पहिले भेट….
पहिल्या भेटीपासून पुन्हा आतापर्यंत
पुन्हा होते…विरहाची भेट….
आणि तुझ नसणं … असणं होऊन जातं..
रडायच्या ऐवजी हसणं होऊन जातं…