पाऊस १
तुला सांगितलं होतं वेळेवर यायला…
तुला सांगितला होतं.मुसळधार पडायला…
तू आला नाहीसच…
अरे अंगाची काहिली होतेय…
मन तर कोरंच झालाय… कागदासारखा..
कागदावरून आठवल…
शब्दांच मळभ मनात साठवल…
तेव्हा बाहेर जरास डोकावून बघितलं…
अरे तू ही भरून राहिला आहेस कि… जरासा गारवा निर्माण झालाय कि…
ज्या दिशेने येतोस…तिथूनच यायला लागला आहेस…
लवकर ये… संध्याकाळची वेळ चुकवत नाहीस म्हणा तू…
पत्र्यांवर, कौलांवर साठलेला पाचोळा हळू हळू रस्त्यावर पडू लागलाय…
पक्षांची भिरभिर सुरु झालीय…
तू आलास न कि कित्ती मज्जा येईल सांगू…
लहान मुलं धावून घराबाहेर पडतील..
तुझ्या धारातून मनसोक्त भिजतीलंच
पण मोठी माणसंही लहान होतील..
चिंब चिंब भिजायला आतुर होतील..
अंग पुसून जरा टीपोयवर पाय पसरून बसू नाहीतोच
वाफाळता चहा आणि गरम गरम कांदा भजी… हजर असेल..
बाहेर तू पडत असशील अजूनही…
पागोळ्यातून रमत गमत राहशील अजूनही…
तुझा एकसंथ आवाज….
विजांच्या गडगडतात.. भजी पचेल.. चहा रीचेल…
शरीराचाच नाही पण मनाचाही स्नान होईल सचैल..
असा तसा नसतोसच तू कधी…
नेहमीसारखा भन्नाट असतोस..
पावसाला कितीही महिने चालू राहिला तरी
पहिला येतोस तेव्हाच घर करतोस मनात…
बघ नुसता तू येणार म्हणून मनातील शब्दांचे मळभ फुटलं..
आणि माझा कोरा कागद भारालासुद्धा…
ये पावसा ये…
धिंगाणा घालत ये…
अंगणी भिजत ये..
मनात रुजत ये…
भन्नाट वा-यासवे ये..
सुसाट थेंबासवे ये…