आपुला परवलीचा शब्द हाच आहे
शरीर असे भिन्न जरी श्वास एक आहे.
येशी भेटायला तेव्हा संथ तुझी चाल ग
जाता सोडुनिया हात त्वरा त्वरा होई ग
असे जरी होते तरी भेट तीच आहे
दिन जरी भिन्न भाव तोच आहे.
वारा येई तुला देई स्पर्श त्याचा धुंद ग
पुनवेला आकाशात चांदणे स्वच्छंद ग
अशा वेळी ध्यानी मनी स्वप्न तेच आहे
निपचित डोळ्यामध्ये झोपतेच आहे..
atishay sunder!!!!!!!!!