आता..पूर्वी..

तू सांगायच्या आधीच कळले…
आता तुझी पाठ दिसणार आहे..
अश्रू काठावर पापणीच्या…
तरी तू जाताना मी हसणार आहे..

आताशा ती नसते माझ्या कविता वाचायला..
हा.. आता हे कठीण जाते थोडे पचायला…
पूर्वी सहज वहायची कविता लेखणीतून..
आता थोडे कठीण जाते काव्य सुचायला..