होते..

मन धुंद होवुनी जाते..
स्वच्छंद होवुनी गाते..
मन थरथरत्या अन भिरभिरत्या पाखरागत होते..

तो मोर नाचतो आता
थुई थुई करुनी रानी..
मन आसुसलेल्या, व्याकुळलेल्या चातकागत होते..

येताना पावूस येतो..
जाताना गंधीत करतो..
तो गंधीत वारा, स्पर्शून जाता..मोहरल्यागत होते..

ते झाड पुन्हा नटलेले,,
बहरून फुल फुललेले..
लज्जेने चूर होणा-या त्या लाजाळूगत होते..

मनपक्षी किलबिल करती..
आठवून तुला रे स्वप्नी..
मन बावरलेल्या, हिरमुसलेल्या प्रेयसीगत होते..