काढले मी वैशाख वणवे… सांगू कसे मी रे तुला..
समजुनी तू घे मला नि चिंब ओले कर मला..
ऐसी होती तृषार्त दृष्टी… शुष्क होती पापणी..
आठवणी बरसल्या अशा… ओलेते केले अश्रुनी..
विरहाची सजा का? का असा दुरावा बोल…?
तू अशी अव्यक्त का नि मी असा का अबोल…?
तू न जावे परत फिरुनी.. दे वचन याचे मला…
तुझे मौन हे जीवघेणे… तेच जास्त जाचे मला..
याच जन्मी तूच नेहमी… वाटे मला हवी हवी…
तूच भेटावीस मजला…. प्रत्येक क्षणाला नवी नवी…
Ashich navi navi bheto ti tula,
kadhi halavi tar kadhi Unad mula pari..
hovo tuzya sarv sadichha purna,
hich ase ichha mazya mani…!!!
😀
धन्यवाद साहेब, तुमची हि कवीता मला फार आवडली, आणि तुम्हाला न विचारताच माझया होणा-या पत्नीस मेल सुध्दा केली तीला सुध्दा हि फार आवडली, मी कवी नाही पण माझा मनातील विश्व तुम्ही शब्दात आणल त्या बद्दल लाख लाख धन्यवाद, मन सुध्दा फार छान आहे, तुम्ही असच लिहत रहाव अशीच इच्छा,,,
पंकज
are abhari ahe mitra……. mazya kavitancha mala asa upyog kadhi honar yachich mi vaat pahat ahe………….. tyamule enjoy the blog .. tuza blog hi mi baghto…………..ok.. keep in touch…