कुणी हात पुढे केला तर द्यावा हात विश्वासाने एखाद्याच्या हातात..
कुणी आर्थिक मदत पुढे करून छातीवर हात टाकण्यापेक्षा…
कितीतरी विश्वासू असतात असे हात..
कदाचित त्या हातांवरच्या रेषांमधेच
दडलेले असेल आपले उज्ज्वल आयुष्य.
हात पुढे करायची कृती करायला काय हरकत आहे…
इतके वाईट अनुभव आले असताना त्याच अनुभवांना लावलेली मोज्मापेची पट्टी
प्रत्येक नवीन क्षणांना लावलीस तर कधीच कुणावर विश्वास नाही ठेवू शकणार तू….
माझ्या डोळ्यात तुला दिसतोय का दगा फटका करणारा लवलेश?
तू म्हणशील असे भावनिक होवून शब्दफेक करण्याचा वय निघून गेलाय…
वय अस थोडीच निघून जात …. आणि वय हे एक मोजमाप आहे हे विसरलीस..
प्रत्येक क्षणाला जिवंत करणारी कृती करणा-याला न वय असत… न अनुभव..
तो विश्वास देतो… आणि श्वास देतो..
विश्वास असेल तरच काळात न कोण विश्वासू आहे आणि कोण विश्वास घातकी
( आगामी क्रमश: मधून )
One thought on “क्रमश:”