जन्म घेतला वाटले घ्यावा
मोकळासा श्वास
लागले जातीचे धब्बे
तिथे अडकला श्वास..
संस्कार काय असे
जातीतूनच करता येतात
मानवाच्या आयुष्यामध्ये..
धर्माचेच शिरस्ते दिसतात?
रीत भात.. करत करत
भिंत खूप उंच झाली..
क्षण असा क्रूर आला कि
मान इंच इंच खाली गेली..
असा कुणीही नाही कि
ज्यांनी जातीवरून छळले नाही..
मारले दंगलीत कित्येकांना
पण त्यांचे धर्म जाळले नाही..
शरीर नश्वर असे तरी
आत्मा म्हणजे जिवंत राहतो…
इथे धर्माला अमरत्व देतात
अन आत्म्याचाही अंत होतो..
दोन अश्रू डोळ्यातून
निघायला मोकळे होतात
मनाचे संकुचित कवाडात
जातीची शेवाळी साचतात..
हि बुरशी घासायला हवी..
मनातली जळमट काढायला हवी..
माणुसकीची तोरण बांधून…
उंब-यावरी रांगोळी काढायला हवी…
सुंदर कविता आहे, अखिल..
>>”मारले दंगलीत कित्येकांना
पण त्यांचे धर्म जाळले नाही..”
हे तर अगदी खरं .. !!
शरीर नश्वर असे तरी
आत्मा म्हणजे जिवंत राहतो…
इथे धर्माला अमरत्व देतात
अन आत्म्याचाही अंत होतो..
अप्रतिम शब्दांकन केले आहेस अखिल! सुन्दर!!!
Are…. kya baat hai….!!!! Uchhaaa……….