तसा हल्ली दुष्काळच पडलाय या अंतरी
अश्रूही भासतात हल्ली पावसासारखे
तेव्हाची गोष्ट वेगळीच होती
शिशिरात हि वाटायचे वसंतासारखे
जेव्हा तुटले सगळे ऋणानुबंध
वाटले कुणीतरी नाळ तोडल्यासारखे
वा-याच्या लाटेवर जेव्हा येते आठवण
तेव्हा कुठे वाटले उजाडल्यासारखे
एकूणच हास्य अन अश्रू साथ होते
तेव्हा कुठे व्हायचे गहिवरल्या सारखे
दु:खासोबत सुखाचे होते धागे प्रीतीचे
कुणी लांब केले तरी व्हायचे विरल्यासारखे
Chaan……… mast suchalay…
मस्त…
अरे अखील काय झाले कसला दुष्काळ पडला आहे.
छान झालीय कवीता. मस्त
खूप सुरेख!! दु:ख व्यक्त करायची ही शैली फार आवडली!