रिते रिते होवून जाते जगणे..
रित्या ओंजळीत आता काय मागणे..
कुणी करावा आभास कुणी द्यावा दिलासा..
रित्या जिंदगीस आता काय सांगणे..
कुणी न्यावे सूर ताल, कुणी उचलावे शब्दांना..
रित्या मैफिलीत आता काय गावे गाणे..
कुणी नसावे मनी कुणी नसावे .. हृदयी..
रित्या दृष्टीत आता काय स्वप्नं पाहणे..
कविता फारच आवडली!
खूप भावपूर्ण आहे! मनातल दु:ख पण किती सुरेखपणे शब्दांत गुंफलं आहे!