दोन अश्रू त्यांच्यासाठी…
ज्यांनी दिला कवितेतून संदेश..
मनालाही दगड बनायला सांगितले..
दोन अश्रू त्यांच्यासाठी…
स्नेह्गंगा, मृद्गंधा, द्रुपद, जातक,
विरूपिका यांची अष्ट दर्शने दाखविली..
त्या व्यक्तीसाठी..
दोन अश्रू त्यांच्यासाठी…
यांत्रावातर, तेच ते, ती जनता अमर आहे..
त्यांची महानता कळण्यासाठी
इतुकी झलक पुरेशी आहे..
दोन अश्रू त्यांच्यासाठी…
ज्यांनी दाखविला ‘ एटू लोकांचा देश’
‘अडम तडम’ लिहित लिहित..
‘राणीच्या बागे’ त एकदा काय झाले..
शब्दांना देवूनी मान फुले फुलविली ज्यांनी..
दोन अश्रू त्यांच्यासाठी…विंदांच्या कवितेसाठी..
कवितेतल्या ‘ज्ञानपीठासाठी..’
दोन अश्रू….
waaa… khup ch chan…! mast ahe kavita.. ka nai chapun ali ani mag… aso.. pan kkharch chan lihies… tula nehamich chan suchat…. keep it up.
खुपच सुंदर …
छान शब्दात श्रदधांजली दिली आहेस…
वा अखिल. खूपच छान.. विंदांना अगदी साजेशी श्रद्धांजली दिलीस.
tumchi kavita khup sunder aahe ashach kavita lihit raha