कुणी समजले असते मला तर
आभाळ पुन्हा दाटले असते..वीज पुन्हा कडाडली असती..
पाचोळ्यावर थेंब पडून.. त्यातून पालवी पुन्हा फुटली असती..
थेंब थेंब अलगद झेलून… जमीन खुशीत निजली असती..
पावूस आलाच असता तर आनंदाचा पूर हि आला असता..
आठवणी, क्षण, झुळूक वा-याची पटकन देवून गेला असता..
पावूस पडून गेल्यावर मग.. पाणी निपचित पडले असते..
तारांवरून थेंब अलगद हळू हळू निथळले असते..
गार गार स्पर्श हवेचा.. जरासा झोंबून गेला असता..
कुंतल गाली पसरून येत.. चेहरा जरासा लाजला असता..
प्रीत रस ओथंबून येता ओठही मग हसले असते..
झुकून पापणी कटाक्षानेही . मजला हळूच खुणावले असते..
पण कुणी समजले असते मला तर ना
अशा किती सांज गेल्या.. कल्पना अशा कित्येक रमल्या..
कुणी झोकून द्यावे इतुके.. मी कुणा सांगितलेच नाही..
कुणी समजलेही नाही.. गुज माझ्या मनीचे…
मनातून वाहणा-या त्या आसवांच्या नदीचे..
अखील, अतिशय सुंदर कविता लिहिल्या आहेत. आणि हो हेडर मधील फोटो देखील अप्रतिम आहे.
Kavita chhan aahe. navin pustakach kuthavar aalay?
मस्त कविराज…काहीही न सांगता समजणार्या व्यक्ती खास असतात…