रंग..
रंग म्हटलं कि आठवतो सण रंगपंचमीचा , होळीचा..
मुक्त हस्ते एकमेकांना रंग लावून आनंदोत्सव साजरा करणारे आपण..
कधी कधी वाईट वाटत जेव्हा.. रंग वाटले जातात..
त्याची lable जाती – धर्माला लावली जातात..
त्याच्यावरून होतात दंगली… पण निसर्गाच्या दुखाचा एकाच रंग
वाहत असतो.. अंगातून रक्त या नावाने..
मग कधीतरी वाटत… रंगत बुडून सा-या..रंग माणुसकीचा पांगळा..
इतुके अंध होतो आपण.. या रंगाच्या भेदाने. जो करतो आपणच.. द्वेषाच्या छेदाने
रंग दुखाचे, रंग सुखाचे… रंग व्यक्तीचे. रंग शक्तीचे..
रंग एकोप्याचे, रंग विरहाचे.. रंग क्लुप्तीचे, रंग युक्तीचे..
रंग राजकारणाचे.. रंग राजकीय पक्षांचे..अंतरंग त्यातील नेत्यांचे..
भ्रष्टाचाराला काळा रंग चढवणा-या पांढ-या वेशातील चोरांचे..
रंग असेही रंग तसेही..
जंगलात दुडू दुडू धावणारे ससेही..
आयुष्य असे रंगुनी जावे..
जसे मुक्त विरहती आकाशी पक्षांचे थवे
असावीत अशी पाने आयुष्यात..
जशी रंगांची मुक्त उधळण होते क्षितिजात..
आयुष्यात तुझ्याही येवो,
असे रंग उधळूनी,
होवो बरसात अन,
खूप साऱ्या आनंदाची,
रंग प्रेमाचा असे गोजिरा,
मिळो तुला सदैव असाच…!!!
अखील तुझे जीवन सप्तरंगात रंगून रंगीत होवो हिक इश्वर चरणी प्रार्थना.