मृत्यू


मृत्यू कुठून कसा सहज बिलगत चाललाय..
आपल्याला…
कुठे अपघातात मिळतो, तर कुठे रुग्णालयात मिळतो..
कधी हृदय विकाराने, तर कधी दुस-याच विकाराने मिळतो..

कुणाला आत्मदहनामुळे मृत्यू मिळतो…
तर कधी कधी कुणाला गळफासाने मृत्यू मिळतो…

कधी छोट्या कारणाने तर कधी मोठ्या कारणाने मिळतो..
भूकंप, पूर, वादळ, त्सुनामी तर कधी स्वताच्या कारणाने…मिळतो..

हल्ली हा मृत्यू फारच स्वस्त झालाय म्हणे…
कधी स्वताहून आपण मरणाकडे चालत जातो,
आताशा मृत्यू बेकरीतही मिळतो म्हणे..
तपासाचे धागे दोरे सुटत नाहीत…
पण नात्यांचे धागे दोरे, जीवंतपणाची नातीगोती तुटून जातात..
आसमंतात पाहत बसतात डोळे वाट त्या जिवलगांची…
पण तिथे परतीची वाटच नसते बर. का…
आशेचे किरणही तिथून पसरत नाहीत…
आपण तिथे गेल्याशिवाय पुन्हा ती माणसे भेटत नाहीत.

पुन्हा रुदन कोरडे कोरडे..होत जाते..
अश्रू सुकून एक रक्तीमेचा थर साचतो डोळ्यात..
आणायचं कुठून उत्साह.. तोच उन्मेष.. पुन्हा
नवीन उगवणा-या फुलांच्या कळ्यात..

बलवत्तर असेल तर नशीब तुम्हाला वाचवत एकदा दोनदा
पण मृत्यू गाठतोच…. कधी न कधी…
उरतो मागे मग एकाच विचार…..
जीवन म्हणजे सुख-दुखांचे भोग…
अन मृत्यू म्हणजे सगळ्यातून मोक्ष..

कवटाळून जेव्हा आपण जवळ करतो त्याला…
सलाम करावासा वाटतो…
‘मृत्यूला’ आपल्या जवळ आणणा-या नियतीला…

8 thoughts on “मृत्यू

    1. @ashish & @Swapna – ब्लॉगवर स्वागत आणि आभारी आहे तुमचा..
      जे म्हणतेस ते तर आहेच ..
      कोडे उलगडायचे असते, सोडवायचे नसते..
      किरणांचे कवडसे झेलत… आयुष्य प्रकाशमान करायचे असते..

      @ devendra..
      असाच लिहीत राहीन मी
      कदाचित उद्या इथे न राहीन मी…
      जिथे कुठे जाईन मी…
      शब्दफुले सांडत जाईन मी…

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s