डोळे

जिथे तू घेतलेस माझे दुख;रूपी अश्रू
तिथेच लागलो मी मलाच विसरू..

व्यक्त न व्हावे इतुके तू तुलाच समर्पिले मला..
जे प्रीत पुष्प मी निर्व्याज अर्पिले तुला..

तू पाहता हलके हळूच बोलती डोळे..
तव नयनांची भाषा ओळखती माझे डोळे..

तव लोचनांचे आभार… पेलती जे अश्रू साभार…
हा प्रेमाचा अविष्कार… नवं उत्कर्षाचा साज संभार..