सापडायचाय मला..


मन झालेय सशासारखे..
कावरे बावरे होणारे..
भावना मनी दडवूनी…
थरथर थरथर कापणारे..

कोण न समजे.. जाणिजे,
यातना लोचने पाही.. जे..
संगती थरथरणारी अधरे..
येवून मजला सावर रे..

आकाशात लुकलुकणारा तारा…
तुझ्याच तर डोळ्यात पाहायचाय मला..
काळजाचा वेध घेणारा शब्द
कवितेत अजून सापडायचाय मला..

12 thoughts on “सापडायचाय मला..

  1. sarvahcha mi आभारी आहे

   @ देवेंद्र..
   अरे मला फक्त समाधानाचे वलय हवेय… बाकी कसले नकोय रे..
   आणि समजा तू म्हणालास तसे काव्य जगतात प्रसिद्धीचे वलय मिळालेच…
   तर मी साखर वाटीन हत्तीवरून (कितीही महाग असली तरी..)

   @ अमोल..
   प्रतिक्रिया आवर्जून देतोस.. म्हणून मनाला भावतोस

   @ कांचन
   कुठल्याही गोष्टीत समर्पण भाव असेल तर ती नक्की मानल भिडते..
   माझ आडनाव भिडे नाही तरीही सारखा कवितेतून हम भिडे..
   आभार व्यक्त नाही करत तुझे..
   उगाच उतरवत नाही हे ओझे.
   समाधान मिळेल ते माझे..
   ऋण राहील ते तुझे..

   @ मुग्धादूत गुप्ते..
   प्रतिक्रिया जोरातच असते..
   आभारी आहे..

   @ अनुजा
   आभारी आहे ग.. काही काही कविता या तुझ्या कवितेला उत्स्फूर्त प्रतीक्रीयेसारख्या असतात म्हणून त्या आधी तुला
   प्रतिक्रिया म्हणून तुझ्या ब्लोग वर दिसतात.. आणि मग मला भावते म्हणून ती माझ्या ब्लोग वर दिसते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s