मन झालेय सशासारखे..
कावरे बावरे होणारे..
भावना मनी दडवूनी…
थरथर थरथर कापणारे..
कोण न समजे.. जाणिजे,
यातना लोचने पाही.. जे..
संगती थरथरणारी अधरे..
येवून मजला सावर रे..
आकाशात लुकलुकणारा तारा…
तुझ्याच तर डोळ्यात पाहायचाय मला..
काळजाचा वेध घेणारा शब्द
कवितेत अजून सापडायचाय मला..