तुझ्यावर रुसलाय..


प्रीत माझ्या नजरेमधली ओळखली नाही तू..
काळजात या अडीच अक्षरी रेघ कोरली नाहीस तू..
म्हणून वेदनांच्या काट्यासहित
‘गुलाब’ तुझ्यावर रुसलाय..

शिशीर पानगळ देवून जातो..चैत्र पुनव चंदन देवून जातो..
माघ फाल्गुन हि येवून जाती … ऋतूपरी मी सावरतो..
तरीही अंतरातल्या पालवीसहित…
‘वसंत’ तुझ्यावर रुसलाय..

नश्वर असे हा देह खर तर..सजीवतेच्या स्पर्शाविना
सरणावरती देह जळाया..ज्वालासुद्धा जाईना..
चीतेतल्या राखेसकट..
‘आत्मा’ तुझ्यावर रुसलाय..

कळली असती प्रीत तुला तर. आता बेवारस नसतो ग.
लुकलुकणा-या ता-यासारखा तुझ्या पापणीत असतो ग.
अंतरीतल्या तळमळीसहित ..
‘जीव’ तुझ्यावर रुसलाय…

17 thoughts on “तुझ्यावर रुसलाय..

 1. @ aparna
  रुसायला कुणी असायला पाहिजे..
  विश्वासाने मनात बसायला पाहिजे..
  हात माझा तयार आहे..कुणी ठेवावा त्यावर हात..
  ओंजळीत रिकाम्या माझ्या… करावी कुणी प्रीतीची बरसात..

  1. @ shraddha
   आपल्या पोरांना म्हणजे?? 🙂 lol.
   अग आधी कुणाला तरी कळू दे माझी कविता.
   मला समजून घेणारी आली कि मग बाल भारती साठी सुद्धा कविता लिहीन..
   keep coming back….

   @ devendra…
   शब्द माझ्यावर रुसत नाहीत..
   फुलपाखरासारखे त्यांच्या इतके…
   माझ्या खांद्यावर विश्वासाने
   कुणी विसावत नाही..

 2. कळली असती प्रीत तुला तर. आता बेवारस नसतो ग.
  लुकलुकणा-या ता-यासारखा तुझ्या पापणीत असतो ग.
  अंतरीतल्या तळमळीसहित ..
  ‘जीव’ तुझ्यावर रुसलाय…

  cute!!!!!!!!

 3. अखिल जोशी, लवकर लग्न कर बाबा! तुझं दुख पहावत नाही. एकदा का आमच्या सारखा झालास की मग बघुत की तु काय कवीता करतोस. ही कवीता फार छान आहe.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s