तुझ्यावर रुसलाय..

प्रीत माझ्या नजरेमधली ओळखली नाही तू..
काळजात या अडीच अक्षरी रेघ कोरली नाहीस तू..
म्हणून वेदनांच्या काट्यासहित
‘गुलाब’ तुझ्यावर रुसलाय..

शिशीर पानगळ देवून जातो..चैत्र पुनव चंदन देवून जातो..
माघ फाल्गुन हि येवून जाती … ऋतूपरी मी सावरतो..
तरीही अंतरातल्या पालवीसहित…
‘वसंत’ तुझ्यावर रुसलाय..

नश्वर असे हा देह खर तर..सजीवतेच्या स्पर्शाविना
सरणावरती देह जळाया..ज्वालासुद्धा जाईना..
चीतेतल्या राखेसकट..
‘आत्मा’ तुझ्यावर रुसलाय..

कळली असती प्रीत तुला तर. आता बेवारस नसतो ग.
लुकलुकणा-या ता-यासारखा तुझ्या पापणीत असतो ग.
अंतरीतल्या तळमळीसहित ..
‘जीव’ तुझ्यावर रुसलाय…