बोटांची करून चिमटी
ओढला जरासा गळा,
अशा ओल्या शपथा…
घेतल्या कितीतरी वेळा..
त्या ओल्या शपथाना
होती आठवणींची खोली..
बघायचे एकमेकांच्या डोळ्यात अन
मुक्यानेच बोलायची प्रेमाची बोली..
त्या बहकत्या क्षणांना
सावरणे जड होते..
बेहोष होणे, वेडे होणे…
तेवढेच आपल्या हाती होते..
सांजवेळ ती अशी..
अनुभवलेली सागर किनारी..
परत जन्मेल का तो क्षण..
आयुष्यात … कधीतरी…
मस्तच झाली आहे कविता.
त्या बहकत्या क्षण
सावरणे जड होते..
या ओळींमधे टायपिंग त्रुटी आहे का?
आपला मी आभारी आहे..
कविता पोस्टली नाही कि लगेच प्रतिक्रिया येते… धन्यवाद..
hoy.. durust karayala vel tar dya ki madam..
हा, हा, हा! अरे, तुझ्या ब्लॉगचं फीड घेतलंय. सहज म्हणून मेल चेक केलं तर तुझी कविता मिळाली. पहिल्या चार ओळींतच इतकी आवडली की म्हटलं ब्लॉगवर जाऊन प्रतिक्रिया द्यावी. तेव्हा मी वेळ पाहिली नव्हती.
Kya baaat hai….!!! khuuuuup chan… atyant god shabdat atyant gondas prem vyakta kel ahe….!!! Khuuuuuuuuuuuup ch bhari…..!!!!
मस्त जमलं बरं का.
लय लय भारी !!
khuupch chhan ahe hi kavita, nice 1
Kavita chhan aahe
very very nice….
ur words r magical….