आयुष्यात … कधीतरी…

बोटांची करून चिमटी
ओढला जरासा गळा,
अशा ओल्या शपथा…
घेतल्या कितीतरी वेळा..

त्या ओल्या शपथाना
होती आठवणींची खोली..
बघायचे एकमेकांच्या डोळ्यात अन
मुक्यानेच बोलायची प्रेमाची बोली..

त्या बहकत्या क्षणांना
सावरणे जड होते..
बेहोष होणे, वेडे होणे…
तेवढेच आपल्या हाती होते..

सांजवेळ ती अशी..
अनुभवलेली सागर किनारी..
परत जन्मेल का तो क्षण..
आयुष्यात … कधीतरी…