अंतरीच्या वादळांना मी साद घालत नाही..
विझलेल्या दिव्यांना उगाच मालवत नाही…
वाहिले वारे जोराने… तरी काहीच ढवळत नाही..
स्पंदनानि वेढलेला गाभारा आढळत नाही..
समुद्र आणि त्याच्या लाटा अफाट तरीही..
रेती रेती झालेले… किनारे मिळत नाही..
तव वादळात मी ज्या हरवलो होतो कधीचा
योग हा आत्ताचा कि भोग तो विधीचा …?
आता शांततेची खपली… झाकते जखमांना..
वारा प्रयास करतो… स्पर्शून भावनांना..
डोळ्यात तरळती अश्रू.. वेदनारहित…
मी बिलगतो त्या क्षणांना… नव-स्पंदनासहित…
अंतरीच्या वादळांना मी साद घालत नाही..
विझलेल्या दिव्यांना उगाच मालवत नाही
छान आहे कविता..
खूप आवडली.
डोळ्यात तरळती अश्रू.. वेदनारहित…
मी बिलगतो त्या क्षणांना… नव-स्पंदनासहित…
किती सुरेख व्यक्त केलं आहे भावनांना…
-Anuja
http://vidnyaya-anuja.blogspot.com
@ Anuja
ब्लोगवर स्वागत आणि प्रतिक्रियेबद्दल आभार
अशीच भेट देत राहा…
आशय व्यक्त करण्या बाबत मंगेश तेंडूलकरांनी त्यांच्या व्यंगचित्रंशी तुझ्या कवितांची तुलना केली आहे ग्रेट!!
kya baat hai Mitra…. Weeeeeeeed…. Todalas… Kalajala Jaun Bhidali kavita….