आताशा निराशेचे पदर एकावर एक असे साठत गेलेत..
क्षण तिमिरात या… थंडीविना गोठत गेलेत..
उसवायची जखम तर खपली हि मरून गेलीय…
वेदना होणार नाही इतपत नियती फुंकरून गेलीय..
कोण जाणे कुठून कुठला वसंत घेवून येईल कुणी…
शिशिरात या पालवी मनामध्ये फुलविल कुणी..
आशा आहेच.. ती वृद्धींगत होतेय..क्षणाक्षणाला..
जळतो तरी पुनर्जन्म माहित असते जसे मेणाला…
कुणी कधीही सोडून जावे.. असे खरे तर नव्हते नाते..
त्यागाला वाटे हिरमुस इतुके आम्ही सोडले धागे..
कुणी कधीही फिरून यावे..अंतरित या शोधून घ्यावे…
अंतरित या जपीन तिजला… पूजीन मी मनोभावे..
अप्रतिम!
ताज्या कवितेला ताजी ताजी प्रतिक्रिया…
आभारी आहे हो…
Kya Baat hai Yaar….!!! Jikalais………