आपण कुठे जात आहोत या गोंधळात मी आहे..
आता ऑफिस मध्ये तीन चार जन आले होते…
त्यात चर्चा सुरु होती… जमीन खरेदी ची
हे जमिनी घेण प्रकरण खूपच फोफावला आहे..
हा इतका पैसा येतो कुठून आणि विकल्यावर जमीन… आपण काय करायचा असा
साधा प्रश्न त्या जमीन मालकांना पडत नसेल?
इतकी गुंतवणूक इतकी स्पर्धा, कशासाठी?
इतका money मेकिंग कशासाठी?
इतके आपण असुरक्षित आहोत का? सगळे प्रश्न भंडावून सोडतात..
उठलो कि जीवनाचे रहाट गाडगे सुरु होते.. अर्थार्जन करायला हवे हे सगळे ठीक आहे
पण इतका क्लिष्ट होत चाललय सगळ…काहीच कळत नाही…
मनाला पालवी फुटावी असे क्षण निर्माण होतील का नाही या संभ्रमात मी आहे..
हा येणारा पैसा योग्य मार्गानेच आलेला आहे कि अजून काही…?
का काळात नकळत आपणच त्या वाम मार्गाने आलेल्या पैशाचे समर्थन करतो आहोत?
तुम्ही हि असेच गोंधळलेले आहात का?
अगदी खरी परिस्थिती.
मृगजळाच्या मागे धावणं चालू आहे मित्रा!
आपल्याला खरोखर काय हवंय हेच कुणाला कळत नाहीये!
अखिल मला हाच प्रश्न नेहमी सतावतो. हा जीवघेणा प्रयास का? काय मिळवणार आहोत आपण यातून. निसर्गाची वाट लागत आहे. आपण जमा करून काय साधणार आहोत. शेवटी त्या जमापुंजीला सोबत वर घेऊन जाणार नाही. म्हणजे ती आपले नातवंड वापरणार. पण ती नातवंड या पृथ्वी तलावर राहू शकली तरच ती वापरू शकणार ना. ज्यांच्या साठी आपण सर्व जमा करीत आहोत त्यांना विचारले का? खर सांगू का अखिल जेव्हा गरजे पेक्षा किती पती पात जास्त मिळते न तेव्हा मनुष्य आळशी बनतो व त्याचे भविष्य अंधकारमय बनते. याची प्रतीची जपान अमेरिका व इतर प्रगत देश आज बघत आहेत. तेथील मुल भोगवादी झाली आहेत आणि आता माझ्या मते ते देश देशोधडीला लागता आहेत. म्हणण्याचा अर्थ हाच आपण या जीवघेण्या स्पर्धेने आपल्या मुला बाळांचे नातवंडांचे भवितव्य अंधकारमय बनवीतआहोत.