कुणी सांगावे न त्यांना तुम्ही कुसकरू नका..
पुन्हा पुन्हा करू नका..गळ्या दोरीच्या आणाभाका.
आता करी काय करी..स्पर्धा गळ्याशी आलेली..
पालकांची स्वप्ने जुनी त्यांनी मुळात पाहिलेली..
पाहिलेली स्वप्ने त्यांनी त्यांच्या मुलां मधी पहिली..
त्याले पूर्ण करण्यासाठी त्यांनी शाळेला धाडली…
कधी केल नाही माहिती.. कधी केला नाही पत्ता
कि मुलाला हवा असतो कुठल्या दिशेचा रस्ता
कसा काय बी करावा… अन गुनामाधी पहिला यावा
इतकी इच्छा ती त्यांची त्यासाठी बिचा-यांचा जीव जावा..
शर्यतीत धाडुनी एकदा हरला कि पोर
अश्रू डोळ्यामंदी येती न जीवाला लागे घोर
हाती होता तो बी चालला..हा कुठला खेळ चालला
चालणारा खेळ चाले… त्यातला खेळाडू थांबला..
मंद मंद हालचाली.. नि शेवटचे डोळे मिटती..
धागे अदृश्य होवुनी… पापण्यांखाली लपती..
कुठे जावून पोचले.. स्वप्न उराशी धरले..
चिमुकले पाखराने देवाघरचे रास्ते धरले..
आता देवाघरी तो अन देवघरापाशी माझी विनंती
त्याला भेटायला येईन तोवरी ठेव आसमंती…
एक सांगावेसे वाटे…
आत्महत्या करणे हे भ्याडपणाचे आहे लक्षण..
त्यावर एकाच उपाय ते म्हणजे आत्मपरीक्षण…
स्वताचे नि पालकांचेही……….
good… nice one….
Kya Baat hai yaaar………… WED….. WED ahe Kavita….
कविता छानच आहे.
http://savadhan.wordpress.com/2010/02/18/%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%B2/
हे ही वाचून पहा