तू फक्त हो म्हण..!


गुलाबच फुल हे प्रेमाचे चिन्ह
ते तुला कस द्याव हे माझ्यापुढे प्रश्नचिन्ह
म्हणूनच हा मागणी पत्राचा प्रपंच..
तू फक्त हो म्हण..! – १

पाऊस आणि जमीन यांचे किती सुंदर प्रेम
जमीन झेलायला आतुर पावसाचा प्रत्येक थेंब…
माझ्या जीवनात तू पावसासारखं बरासव..
त्यासाठी मी रात्रंदिवस तरसावं…
तू बरसण्यासाठी नि मी तारासंयासाठी
एकाच गोष्ट आवश्यक आहे…
ती म्हणजे…
तू फक्त हो म्हण..! – २

तुझ माझ्या आयुष्यात येण म्हणजे
चंद्राला पौर्णिमा लाभण्यासारख आहे..
पण त्यासाठी त्याला महिनाभर प्रतीक्षा करावी लागते…
माझ्या प्रतीक्षेचा काळ तर
तुझ्याच हातात आहे…
तू फक्त हो म्हण..! – ३

तुला काय सांगायचं ते तुझ्या
नजरेतून कळत ..
हल्लीच्या E -mail पेक्षा ते
जास्त वेगाने मिळत…
पण प्रेमाची प्रत्यक्ष कबुली मिळाली तर
फारच बर होईल..तेव्हा please
तू फक्त हो म्हण..! – ४

भाव बंधन रेशमाची
त्याला जोड संयमाची
तुझ्या होकारानेच लिहू शकेन मी
अडीच अक्षरे प्रेमाची…
म्हणून..
तू फक्त हो म्हण..! – ५

14 thoughts on “तू फक्त हो म्हण..!

 1. तुला काय सांगायचं ते तुझ्या
  नजरेतून कळत ..
  हल्लीच्या E -mail पेक्षा ते
  जास्त वेगाने मिळत…
  पण प्रेमाची प्रत्यक्ष कबुली मिळाली तर
  फारच बर होईल..तेव्हा please…

  मस्त जमली आहे….

 2. बरं मी तो ब्लॉग प्रायव्हेट केलाय…!
  आता हा नविन ब्लॉग सुरु केलाय बघु कितपत प्रायव्हेट राहतोय…!
  बर आणखी एक तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रीया वाचुन वाटलं नकोच थांबवावं लिहणं….!

 3. भाव बंधन रेशमाची
  त्याला जोड संयमाची
  तुझ्या होकारानेच लिहू शकेन मी
  अडीच अक्षरे प्रेमाची…
  म्हणून..
  तू फक्त हो म्हण..! – ५

  sahi ahe ………

 4. tu phakt ho mhan….

  mag baki sagale aapsukach hoil ….
  purn chandrache darshan mala aamavasela hoil…

  email chi garaj nahi tu phakt.. manat mhan…
  pan… ho mhan…

  hee mazi apeksha nahi aakansha aahe …
  baki sarv tuzyach hatat aahe…

  mhanunach mhanato tu phakt ho mhan

 5. भाव बंधन रेशमाची
  त्याला जोड संयमाची
  तुझ्या होकारानेच लिहू शकेन मी
  अडीच अक्षरे प्रेमाची…
  म्हणून..
  तू फक्त हो म्हण..! – ५

  apratim ………khup khup sundar………..

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s