आधी माफी मागतो… कि इतके दिवस गायब होतो त्याबद्दल
आधी बिझी होतो मग रस्त्याचे काम सुरु असल्याने फोन लाईन उखडली होती त्यामुळे नेट चालू नव्हते..
तुम्हाला सर्वाना नवीन वर्षाच्या आणि संक्रांतीच्या शुभेच्छा…
तिळगुळ घेवून ब्लोग गोड गोड लिहावा आणि गोड गोड वाचून गोड गोड प्रतिक्रिया द्यावात/./ हीच शुभेच्छा
बाकी आता काय लिहावा काळात नाहीये.. म्हणजे सुचत नाहीये
मन शांत असेल कि सर्व काही सुचत…
नुकताच एक चित्रपट पहिला
थ्री idiots … तुम्ही हि बघितला असेलच.. नसेल तर बघा…
गेल्या १० वर्षातील सर्वोत्तम चित्रपट आहे असे माझे स्वताचे मत आहे…
एखादी पटकथा strong असेल आणि दिग्दर्शकाने प्रत्येक व्यक्तिरेखेला नीट मार्गदर्शन केले आणि कलाकाराने योग्य तो न्याय भूमिकेला दिला
कि साधी गोष्टही परिणामकारक रित्या दाखवता येते…
खूप काही शिकण्यासारखे आहे.. त्या चित्रपटातून… गंभीर विषय अतिशय मार्मिक पणे आणि विनोदाच्या अंगाने सांगितला आहे.. त्यातील चित्रपटपाहताना
चित्रपट गृहातील हशा तिथेच ठेवला आणि मनातून खूप खोलवर विचार केला तर आपणच आपल्याला नव्याने गवसू असेही मला वाटते…
किती तरी जन असेल आहेत जे engineer झालेत आणि आता software क्षेत्रात काम करीत आहेत.. म्हणजे शिक्षण आपण एक घेतो आणि अर्थार्जन करण्यासाठी दुसरे क्षेत्र निवडतो…
आपली स्वताची दिशा आधी ठरवली जात नसल्यामुळे असे होते. मी हि वाणिज्य शाखेचा पदवीधर आहे.. पण आता प्रिंटींग क्षेत्रात आहे… संगणक चालवतो. designs बनवतो… लिहितो…
हेच मला आधी गवसले असते तर… किवा त्यावर विचार करून मीच तो मार्ग आधी निवडला असता तर मला त्या मार्गातील mile stone कदाचित आधीच मिळाले असते…
असो…..
तेव्हा नाही तर आता तरी…. इथून पुढे जास्त concentration आवडत्या क्षेत्रात करायचे..जेणेकरून आपण किती लांब जावू शकतो…. याचा अंदाज येईल.
आता नवीन वर्षात एवढेच लिहून थांबायचे नाही…. खूप लिहायचे आहे, चिंतन करायचे आहे…
एकंदरीत… आपण आपल्यातील बदलाने एक इंच तरी आपल्या आजूबाजूचा परिसरातील वैचारिक बदल घडवू शकतो… काहीतरी उदाहरण समाजापुढे ठेवू शकतो..
संस्कृतीची जपणूक करताच वर्तमानातील गोष्टीना, आव्हानांना स्वीकारत… योग्य त्या निर्णय प्रक्रियेतून समर्पक फळ कसे मिळेल याचा निदान प्रयत्न तरी करू शकतो….
संक्रांतीच्या शुभेश्च्या!!!
तुम्हालाही संक्रांतीच्या शुभेच्छा….
मेल पाठवतो…. ब्लोग meet ला जायचे fix नाही.. बघू या कसे काय होते ते…
असाच लिहत राहा…
मनापासुन शुभेच्छा
आभारी आहे तुझा देवेंद्र
तुझ्यातच लपला आहे देव..म्हणजेच इंद्र..