फक्त हसावस तू , माझ्या हृदयात बसावस तू
मी हाक मारली तर, माझ्याजवळ असावस तू
फक्त आठवावं तूला , डोळ्यात साठवावं तुला
रुसून कधी बसलीसच , तर मनवाव तुला
फक्त साद दे मला, मी हाक मारली तर
शपथ मला तुझी, वाट वेगळी धरली तर
फक्त तुझा सहवास असावा, मनी मर्मबंधाचा ठेवा
‘प्रेमा’लाही वाटायला हवा, अपुल्या जोडीचा हेवा
फक्त मीच का लिहावी, तुझ्यासाठी हि कविता?
तू हि काही लिहून पाठव, झ-यासाठी जशी वाहते सरिता
“झ-यासाठी जशी वाहते सरिता”
असंच नैसर्गीक असतं सगळं.
छान कविता. आवडली.
sundar yar.sahi