१. दिस का निघत जाई
रात्र का संपत नाही
क्षणोक्षणी तुझी आठवण
आठवणीला ‘थांबणे’ नाही
२.नित्य नवे दिन येतील
आठवणी अनंत होतील,
तू इथे ‘प्रत्यक्षात’ असता
‘निशा’ हि संथ होतील..
३. तू कटाक्ष टाकता
मी होतो बेभान
मनात मग प्रणयाची
तडीत (वीज) घालते थैमान
४.मनात आलेले बोलतो मी
मनच गुपित खोलतो मी
गप्पच बसलो कधी तर
आतल्या आत सलतो मी..
अखीलराव,
छान लिहिता चार ओळींच्या चारोळ्या,
आभारी आहे
लिखाणाची सुरुवात चारोळी पासूनच झाली आहे
एक पुस्तक २००४ मध्ये प्रकाशित झाले होते…
त्या पुस्तकाला अभिप्रेत करताना
प्रख्यात व्यंगचित्रकार श्री. मंगेश तेंडूलकर यांनी
मला दोन पानी पत्र सुद्धा लिहिले आहे.
charolya chhan aahet…