प्रेमाचं दुसरं नाव सहवास
सहवासाचं दुसरं नाव विश्वास
विश्वासाचं दुसरं नाव भावनांचा प्रवास
त्या प्रवासाचं दुसरं नाव उमलत्या फुलांचा सुवास
फुलांच्या सुवासाचं दुसरं नाव भ्रमरांचा अट्टाहास
भ्रमरांच्या अट्टाहासाच दुसरं नाव प्रीतीचा श्वास
प्रीतीच्या श्वासाचं दुसरं नाव ध्यास
ध्यासच दुसरं नाव मी
आणि माझं दुसरं नाव तू.
रोज चांगल्या कविता लिहणारयाच दुसरं नाव अखिल जोशी …
प्रतिक्रिया छान देणा-याच दुसर नाव देवेंद्र चुरी
धन्यवाद सामंत काका तुम्ही सर्वजण रोज येवून ब्लोग बघता,
तेवढा वेळ काढता याबद्दल आभारी आहे.. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढतो……..
मस्त कविता.छान वाटली
अरे मित्रा, नावाच्या पुढे गाडी गेलीय का? बाकी कविता मात्र झकास! १५ वर्ष माझ्या संसाराला झाली. सुखी संसाराची गुरुकिल्ली आज तुझ्या कवितेत वाचायला मिळाली. बाकी ही कविता चोरली जायची शक्यता मात्र दांडगी आहे. कारण प्रत्येक मुलीला रुखवतात ही कविता ठेवायला आवडेल.
गाडी ‘नावाच्या’ पुढे जाते, अडखळते, मनातल्या मनात..
अजुनी शोधीत आहे…मी जोडीदार जीवनात
यंदा कर्तव्य आहे असे म्हणतात मला..
कुणी सुचवेल का चांगले स्थळ मला..?
अभिप्रायाबद्दल आभारी आहे
माझ्या कवितेतून तुमच्या सुखी संसाराची गुरुकिल्ली जर सापडली असेल
तर ते माझे अहोभाग्य आहे… आणि प्रत्येकाला त्याचे हवे असलेले मानस
माझ्या कवितेमध्ये दिसो आणि पूर्ण होतो हीच जगन्नीयत्याकडे प्रार्थना..
khoop sundar ahe kavita…ashach barach kavita lihit ja ajun…mala mazya eka friend cha blog tayar karyawayacha ahe..kase karyache jara sangal ka pl. ti khoop sundar kavita karate…me tichach kavita post karate..tumhi wachlya astil.