माऊस ने फस्त केला कॅट चा डाव
वाढतच चालला आहे रेस ऑफ rat चा भाव
विधानसभेत मोडला ज्यांचा कॅट चा डाव
त्या वाघाने घातला सचिन च्या bat वर घाव
मनसे ने केला मराठी chat चा ठराव
आझमीला घातला राजसेवकांनी थेट घेराव
बावन्न पत्ते म्हणजे एक कॅट चार भाव
त्यात लागतात असंख्य डाव
कुणाचे असतात कांदे पोहे
तर कुणाचे असतात वडा पाव
कुणाचे दात आणि कुणाचे ओठ
आम्हाला काळातच नाही राव,
दहशतवादी जेव्हा घालतात आपल्या जीवावर घाव,
त्याच्याही निषेधाचा हे करतात ठराव,
सख्खे भाऊ वागतात सावत्रासारखे
आणि सावत्र होतात सख्खे भाव
हे विडंबन नाही हे तर वास्तव आहे. प्रखर शब्दात पण धारदार ओघात नेमका भाव पोहचला. राग येतो ह्या आपमतलबी राज्यकर्त्यांचा. सहज सुंदर काव्य प्रतिभा जाणवली.
राजकारण हे वाईट नाही..
एकूणच ती लोकच राजकारणाशी जे करत आहेत
ते राजकीय विडंबनच आहे….
दोन्ही प्रतिक्रिया खूप आवडल्या,
माझ्या कवितेपेक्षा गोड होत्या…
शतश: आभारी आहे..