तू सांग मला समजावून प्रेम म्हणजे नक्की काय?
विश्वासच मजबूत जाळ कि मृगजळाची पातळ साय?
तू सांग मला समजावून प्रेम होत तरी कसं?
खरच स्पंदनांच्या लहरी उमटतात कि मनच होत वेडपीस
तू सांग मला समजावून प्रेम असत का आंधळं?
अधीर होतात गात्र गात्र का नुसताच साचतं आभासाच तळ?
तू सांग मला समजावून प्रेम खरच आहे का आपल्यात?
आपल्यातल्या विश्वासात? विश्वासातल्या श्वासात?
श्वासातल्या माझ्यात? माझ्यातल्या तुझ्यात?
Good.
kavita ani site design donhi.
अखिलेश मित्र सुरेख कविता लिहिली आहेस.
तू सांग मला समजावून प्रेम होत तरी कसं? वा वा!!
अखील,
कविता उत्तमच आहे.
पण सांगू का”
“प्रेमाला उपमा नाही ते देवा घरचे देणे”
akhilesh tuzi kavita awadali. asach lihit ja. by: Girish
नको घेवूस तू समजावून मित्रा,
भेटशील जेंव्हा तिला सागराची सीमा रेखा,
मोजत बसू नकोस तू गड्या,
समजेल तुलाही एक जन्म नाही पुरा…….
सुंदर अलगद कोमल भावनांचे प्रेम छान लिहिलेस.
खूप आवडले.
एक प्रयत्न ..येतो आतून
कवितेचे माध्यमातून
मनात साचलेलं अलगद उतरत
कागदावरती लेखणीतून..
दोन्ही प्रतिक्रिया खूप आवडल्या,
माझ्या कवितेपेक्षा गोड होत्या…
शतश: आभारी आहे..
far chan kavita ahe. nice to find u. keep it up.
ati uttam…….
mastach
very nice…………..