स्मशान : हल्ली निवांत भेट होण्याची जागा


कदाचित तुम्ही म्हणाल की, काल नाही ब्लॉग लिहायला लागला तर काही हि बरळतोय कि काय
पण सकाळीच एका मातीला जावून आलो..
आमच्या जवळच राहणाऱ्या आजी गेल्या… आजी म्हणजे एक जिव्हाळ्याचा शब्द आहे… नाही का?
त्यांचा वयही खूप होत पण त्या दोन चार दिवसापूर्वी ठणठणीत होत्या, गेल्या दोन-चार दिवसात अन्न पाणी जात नव्हतं इतकंच..
स्मशानात जात असताना आजू बाजूला झालेल्या इमारती पाहुनी एकजण हळूच कुजबुजला
कि अरे रोज असे हे दृश्य बघायला लागणार असेल तर इथे कशाला आपण घर घ्यायचे…?
नशीब त्या आजूबाजूच्या कुठल्याच इमारतीचा बिल्डर आमच्या सोबत नव्हता….
आणि त्याने हि जर गोष्ट ऐकली तर त्याला “इथले स्मशान आम्ही दुसरीकडे हलवणार आहोत” अशी जाहिरात केल्याशिवाय त्याचे block जाणार नाहीत
हे नक्की करायला पाहिजे…
आम्ही स्मशानात गेल्यावर सगळी तयारी सुरु असताना एक एक ग्रुप तयार झाले…
कोणी सोसायटी वर बोलत होते, कि
किती दिवस झाले अजून सोसायटी झाली नाही………. बिल्डर कॉमपौंड घालणार होता, हे करणार होता,
कुणीतरी तावातावाने बोलत होता, एकही सोसायटी अशी नाही कि जिथे भानगड नाही, कुठे कोण बिल्डर ला
शिव्या घालत होते, तर कुणी सोसायटी ची थकबाकी ठेवली त्याला…. बर आवाजाचा volume कमी होत नव्हता
एकीकडे इथल्या ब्राह्मण समाजाच्या वरती भाष्य चालू होते, बोलणारेही त्याच समाजाचे होते बर का?
कि अरे समाजाची आपण मीटिंग ठेवतो, त्याला कुणी येत नाही
सत्कार समारंभ ठेवले तर फक्त ज्या विद्यार्थ्यांचा सत्कार असतो तो आणि त्याचे पालक इतकेच लोक येतात…
बाकी कुणी येत नाही. थोडक्यात समाजामधील लोकांमध्ये असलेली अनास्था त्याने बोलून दाखवली
बर इथल्याही ग्रुप मध्ये आवाजाचा volume कमी होत नव्हता.
एकीकडे महाड वरून पुण्याला जाणारा जवळचा रस्ता कसा तयार होतो आहे ते बघत होते,
बर इथल्याही ग्रुप मध्ये आवाजाचा volume कमी होत नव्हता.
तर कुणी दोन मित्र भेटले ते बोलताच होते, किती दिवसात भेट झाली नाही वगैरे वगैरे,
मधेच कुणाचे mobile phone खणखणत होते, त्यांचेही फोन वरील संवाद चालूच होते
बर इथंही आवाजाचा volume कमी होत नव्हता.
थोडक्यात जो तो प्रत्येकाला बर्याच दिवसांनी भेटत असल्याने गप्पा मारण्याचा क्षण आणि भेटण्याचा क्षण एकत्र आले..
ज्या आजी निवर्तल्या त्यांचंही वय फार होतं
निष्कर्ष असा काढला कि मृत्यू झालेल्या माणसाचे वय जेवढे जास्त तेवढा स्मशानात आवाजाचा volume जास्त

घरी परत जाताना हातात आमच्या रिकामी शिडी होती…
आणि मनामध्ये…
स्मशानात एका पाटीवर लिहिलेले
“माणसाला जीवनात काही नाही मिळाले तरी मृत्यू हा मिळतोच…”
हे वाक्य मनात घर करून राहिलं….

12 thoughts on “स्मशान : हल्ली निवांत भेट होण्याची जागा

  1. आता काय म्हणावं हेच समजत नाही. लेख खुप अप्रतिम जमलाय, विषय मात्र फार गंभीर आहे. अरे मित्रा सर्वत्र हीच परिस्थीती आहे. लोक आपली सवड पाहुनच कामं करतात, आणी आपल्या या सवडीतुन त्यांना जर वेळ मिळालाच तर ते आजु-बाजुच्या गोष्टिचा विचार करतात. नाहीतर कुणी जगो किंवा मरो. लोकांना त्याचं काही सोयर-सुतक नसतं.

  2. अखिल तुमच्या कविता वाचण्याचे भाग्य लाभले मला…..या तुमच्या कवितांवर मी नेमकी काय प्रतिक्रिया देवू हे उमजतच नाहीये ……पण …..स्मशान …निवांत भेटण्याची जागा,,,ही कविता मात्र मानत घर करून गेली ….तुमच्या लेखणीला आणी तुमच्या कल्पना शक्तीला प्रदीर्घ औश्य लाभों ….तुमच्या प्रकाशमय भवितव्यासाठी शुभेच्या!!!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s