स्पंदन माझं त्यांच्यासाठी


स्पंदन माझं त्यांच्यासाठी
ज्यांनी वाचवलं देशाला,
प्रसंगावधान दाखवून जिवंत पकडलं त्या कसाबला
स्पंदन माझं त्यांच्यासाठी
जे होते तिथे लढायला धैर्याने
विजय मिळवला त्यांच्या अमर्याद शोर्याने
स्पंदन माझं त्यांच्यासाठी
ज्यांनी केला नि;पात त्या क्रूर कर्म दहशतीचा
लोकांच्या मनात दडलेल्या भीतीचा
स्पंदन माझं त्यांच्यासाठी
ज्यांच्या वीरांगना एका डोळ्यात अश्रू असताना
एका डोळ्यातून आपला देशाभिमान दाखवताना
स्पंदन माझं त्यांच्यासाठी
ज्यांना आलं वीर मरण
जेव्हा गेलं त्यांना अमरत्व शरण
स्पंदन माझं त्यांच्यासाठी
ज्यांच्या देहात घुसून गोळ्या झाली शरीराची चाळणी
कुटुंबाचा कमावता हात गेला अशा धोकादायक वळणी
स्पंदन माझं त्यांच्यासाठी
जे आजही दुखातून सावरू शकले नाहीत…
आज त्यांच्या स्मृतीतून अजून त्यांचे आपले गेले नाहीत..
स्पंदन माझं त्यांच्यासाठी
ज्यांनी बजावली कामगिरी बाजीप्रभू सारखी
ज्यांची कुटुंब झाली त्यांना कायमची पारखी
स्पंदन माझं त्यांच्यासाठी
ज्यांना अजूनही आठवतात ते क्षण
धैर्याचे, दहशतीचे आणि निर्भीडतेचे
स्पंदन माझं त्यांच्यासाठी
ज्यांनी केला निर्धार पुन्हा असल्या शक्तींचा उदय न होण्याचा
आणि आलेच कुणी तर त्यांना नि; पात करण्याचा
स्पंदन माझं त्यांच्यासाठी
ज्यांना आहे आदर आपल्या सैनिकांवर
आपण सुरक्षित आहोत ज्यांच्या आधारावर
स्पंदन माझं त्यांच्यासाठी
त्यांना सदैव चीर;शांती लाभू दे..
त्यांच्या स्फूर्तीने आम्हास एक वेगळी स्फूर्ती लाभू
बिमोड करावया दहशतीचे
रक्षण करावया भारतमातेचे….

जय हिंद…
भारत माता कि जय !

24 thoughts on “स्पंदन माझं त्यांच्यासाठी

  1. आभारी आहे….
   माणसाच्या संवेदना जागृत असल्या कि असा काही लिहिला जात.
   मुळात या संवेदना जगू देण हे आजूबाजूला घडणार्या गोष्टींवर अवलंबून असत
   आपण ते नेहमी अब्सोर्ब करत असतो आपोआप

 1. आवडली कविता….मनापासून लिहीलीये तुम्ही….
  मागच्या वर्षी याच वेळेस माझे आई-बाबा मस्कतला यायचे होते…ते इथे सुखरूप पोहोचे पर्य़ंत जीवात जीव नव्हता.
  तूम्ही विचार छान मांडलेत….

  1. ते असाच लिहील गेलाय..
   मनात साठलेला
   त्याला मी फक्त निमित्त मात्र आहे एवढाच
   कुठून येत माहित नाही…
   पण कुठेतरी त्याला मूर्त स्वरूप प्राप्त होत
   बस…असाच आहे हे सगळ..

 2. स्पंदनांची आवर्तने येतात लाटेसारखी.
  जाज्वल्य राष्ट्र अभिमान, आदर, व अलवार भावनांची,
  मी पण एक थेंब त्यातील उसळतो २६ अकरा साठी.
  लाट उतरली पापणीत, भरती आली भारतीय सागराची.

  सुरेख लिहिता.

  1. तुला शेवटी वेळ मिळाला का काढलास?
   धन्यवाद…. तुझी प्रतिक्रिया महत्वाची होती
   खर तर पुन्हा लिखाण काळात नकळत तुझ्या बोलंयामुलेच सुरु झालेय…
   हे वास्तव आहे….
   आभारी आहे..
   तसा मी लहान पानापासूनच भारी आहे.. 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s