आम्ही जन्माचे गोंधळी, आम्ही जन्माचे गोंधळी
कुणी मराठीवरून घालतो गोंधळ
कुणी भैयावरून घालतो गोंधळ
कुणी विधानसभेत तर
कुणी राज्यसभेत घालतो गोंधळ
हि टिमकी राजकारणासाठी हि टिमकी स्वार्थासाठी
आम्ही जन्माचे गोंधळी, ते वाजवती सारखी
कुठे जायचे असेल तर त्याचा गोंधळ
रस्त्यावर गेलो तर गाड्यांचा गोंधळ
शांतता शोधावी तर होर्न चा गोंधळ
शुद्ध हवा शोधावी तर प्रदूषणाचा गोंधळ
ती टिमकी खोटी पर्यावरणाची…. ते वाजवती सारखी
आम्ही जन्माचे गोंधळी, आम्ही जन्माचे गोंधळी
राजकारण म्हणावे तर त्यातही गोंधळ
पक्षा पक्षाचा गोंधळ नि नेत्यांचा गोंधळ
कुणाचा गोंधळ खातेवातापाचा
तर कुणाचा जागावाटपाचा
ती टिमकी राजकारणाची ते वाजवती सारखी
आम्ही जन्माचे गोंधळी, आम्ही जन्माचे गोंधळी
विकास म्हणावा तर उद्घाटनाचा गोंधळ
उदघाटनात श्रेय लाटण्याचा गोंधळ
विकास कामाच्या tender चा गोंधळ
tender च्या वाटपात निधीचा गोंधळ
ती टिमकी विकासाची ते वाजवती सारखी
आम्ही जन्माचे गोंधळी, आम्ही जन्माचे गोंधळी
अहो झोपाद्पात्त्यांचा गोंधळच गोंधळ
त्यांच्या मान्यतेचा गोंधळच गोंधळ
माणसांचा गोंधळ, पैशाचा गोंधळ
घराघराचा करत्यात ते गोंधळ
म्हाडा भी नाही सिडको भी नाही
सुधारू शकत घराचा गोंधळ
ती टिमकी घर देण्याची ते वाजवती सारखी
आम्ही जन्माचे गोंधळी, आम्ही जन्माचे गोंधळी
अहो भन्नाट आहे विजेचा गोंधळ
वीजच नाही नि बिलाचा गोंधळ
बिलात आकडे म्हणजे बी गोंधळ
बिल भरून सुद्धा विजेचा गोंधळ
लोड शेडींग कमी करायचा गोंधळ
वीज पूर्ण देण्याचा गोंधळ,
ती टिमकी पूर्ण विजेची…. ते वाजवती सारखी
आम्ही जन्माचे गोंधळी, आम्ही जन्माचे गोंधळी
पाण्याचा नावाने बोम्बला गोंधळ
धरण बांधू असा आश्वासनाचा गोंधळ
कुठे pipe line सारखी फुटण्याचा गोंधळ
कुठे पाणी नाही असे बघण्याचा गोंधळ
ती टिमकी पूर्ण विजेची…. ते वाजवती सारखी
आम्ही जन्माचे गोंधळी, आम्ही जन्माचे गोंधळी
कुठे होतो आहे महागाई चा गोंधळ
कुठे होतो आहे धान्य टंचाई चा गोंधळ
हे गोदामाचे मालक श्रीमंत व्हायचा गोंधळ
गोंधळात गोंधळ सोन्याचा गोंधळ
share च्या अनिश्चीततेचा गोंधळ
ती टिमकी पूर्ण समृद्धीची, ते वाजवती सारखी
आम्ही जन्माचे गोंधळी, आम्ही जन्माचे गोंधळी
आता हा गोंधळ थांबायला हवा, डोळ्यांचा goggle काढायला हवा
नाहीतरी यांचे हे असेच चालेल,
आणि राहू आपण
जन्माचे आंधळी , आपण जन्माचे आंधळी
खरच सुंदर आणी वास्तववादी आहे कविता ….
kas suchat re…? ani te hi evadha bharbharun…!!! mast….
mitra, Manatala Gondhal tu barobar mandlaas Shabdaat. Gadya, Jinkalas.
sagala godhal ghatlas …….pan tuzya manatla godhal nahi sagitlas